क्रिकेट हा खेळ खूप रोमांचक आणि प्रसिद्ध आहे. नाही म्हटलं तरी जगाच्या पाठीवरील दोन डझन देशात हा खेळ माहीत आहे. भारतात या खेळाचे एका वेगळ्याच उंचीचे वेड बघायला मिळते. क्रिकेट हा खेळ कालानुरूप जस जसा बदलत गेला तस तसे माध्यमात देखील त्याचे प्रसारित करण्याचे ढंग बदलत गेले. या खेळात समालोचन करणारे व्यक्ती बऱ्याचदा लक्षात राहतात कारण त्यांचे बोलणे असेल, दिसणे असेल, बोलण्याची आगळी वेगळी शैली असेल. आयपीएलमुळे या खेळात ग्लॅमर आले. त्यातल्या त्यात महिला निवेदिके विषयी जास्त चर्चा होतांना दिसते. अशीच काहीशी चर्चा ‘जैनब अब्बास’ हिच्या विषयी होताना दिसतेय. जैनब अब्बास ही क्रिकेट निवेदिका असून तिचे समाजमाध्यमावर लाखो चाहते आहेत.
जैनबचा जन्म 14 फेब्रुवारी 1988 साली लाहोर येथे झाला. तिचे वडील क्रिकेटपटू होते, तर आई खासदार आहे. तिने इंग्लंड येथून मार्केटिंग अँड स्ट्रॅटेजीमध्ये एमबीए केले आहे. सुरुवातीला तिने पाकिस्तानस्थित डॉन आणि दुनिया न्यूजसाठी खेळ विषयक लेख लिहिले. त्यानंतर तिने ‘क्रिकेट दिवानगी’ आणि ‘सवाल क्रिकेट का’ यासारख्या टॉक शोमध्ये निवेदिका म्हणून काम पाहिले.
सन 2019 मध्ये जैनब अब्बासने आयसीसी विश्वचषक स्पर्धेत पहिली पाकिस्तानी निवेदिका होण्याचा मान पटकावला म्हणूनच ती पाकिस्तानसह जगभरातील क्रिकेटरसिकांच्या पसंतीस उतरली आहे. अर्थात हे तिच्या मेहनतीचे फळ आहे.
ती समाजमाध्यमांवर देखील खूप सक्रिय असते. लॉर्ड्स कसोटीत मोहम्मद सिराजची तुफानी अंदाज आणि जबरदस्त गोलंदाजी पाहून जैनब अब्बास त्याची चाहती बनली आहे. सिराज विषयी ती म्हणते, “मोहम्मद सिराज जागतिक दर्जाचा गोलंदाज बनत चालला आहे. सिराजने ऑस्ट्रेलियामध्ये दमदार कामगिरी केली आणि बऱ्याच विकेट्स देखील मिळवल्या. यानंतर, आता तो इंग्लंड दौऱ्यावरही जबरदस्त कामगिरी करत आहे. सिराजमध्ये प्रचंड वेग आणि नियंत्रणाने गोलंदाजी करण्याची प्रतिभा आहे.”
“दहा- पंधरा वर्षांपूर्वी भारताकडे असे वेगवान गोलंदाज नव्हते. आता या नवीन वेगवान गोलंदाजांमुळे भारत हा उत्कृष्ट संघ बनला आहे. बुमराह आणि इशांत हे उत्कृष्ट गोलंदाज आहेत. मोहम्मद शमीसुद्धा प्रभावी गोलंदाज आहे आणि आता मोहम्मद सिराज सुद्धा भारतीय संघामध्ये आला आहे, त्यामुळे भारतीय संघ खूप प्रभावी आणि दमदार बनला आहे.”
जैनब अब्बास यापूर्वीही अनेकदा विविध कारणांनी चर्चेत आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
‘दिग्गज असतात ते, असे बसतात’, पृथ्वी शॉला ‘हिटमॅन’च्या मांडीवर बसलेलं पाहून जाफरला सुचली मस्ती
तालिबानची क्रिकेटवरही दहशत, ‘या’ मालिकेचे भविष्य अधांतरी
टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या न्यूझीलंड संघावर माजी भारतीय क्रिकेटर नाराज, म्हणाला…