लीड्सच्या मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत या संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिला दिवस इंग्लिश फलंदाजांनी गाजवल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील इंग्लिश फलंदाजांचा बोलबाला सुरू आहे. सलामीवीर फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केल्यानंतर जो रुटनेही शतकी खेळी केली आहे. यासह त्याने अनेक मोठमोठे विक्रम आपल्या नावावर केले आहे. त्यामुळे पुढील ‘रनमशीन’ जो रूट बनतो की काय? अशा चर्चा सुरू व्हायला लागली आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याच्या नावेसुद्धा अनेक विक्रमाची नोंद आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. विराट कोहलीच्या कसोटी कारकीर्दीची सुरुवात २०११ मध्ये झाली होती. तेव्हापासून त्याने कसोटीत २७ शतके तर ७ द्विशतके झळकावली आहेत. परंतु गेल्या दोन वर्षांपासून त्याला एकही शतक झळकावता आले नाहीये. त्याने शेवटचे शतक २०१९ मध्ये बांगलादेश संघाविरुद्ध झळकावले होते. त्यानंतर शतक तर सोडाच अर्धशतक झळकावण्यासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागला आहे.
एकीकडे विराट कोहली संघर्ष करताना दिसून येत आहे; तर दुसरीकडे इंग्लिश कर्णधार जो रूट एकापाठोपाठ एक शतक झळकावत आहे. विराट कोहलीने गेल्या २ वर्षात एकही शतक झळकावले नाही; तर जो रुटने गेल्या २ वर्षांत ७ शतके झळकावली आहेत. ज्यामध्ये ३ द्विशतकांचा समावेश आहे. या ७ शतकांपैकी ३ शतके त्याने भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत केली आहेत.(Who is real runmachine joe root or Virat Kohli, click here to see the records)
भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज
जो रूट भारतीय संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत धावांचा पाऊस पाडत आहे. त्याने पहिल्या दोन्ही सामन्यात तुफानी शतक झळकावले होते. तसेच तिसऱ्या सामन्यातील पहिल्या डावात देखील शतक झळकावले आहे. या डावात ५४ धावा करताच त्याने भारतीय संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत त्याने पाकिस्तानच्या जावेद मियाँदाद यांना मागे टाकले आहे. याखेरीज तो सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये भारतीय संघाविरुद्ध कसोटीक सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
रूट नॉन-स्टॉप! आक्रमक शतकासह घातली आणखी दोन विक्रमांना गवसणी
इंग्लंड दौऱ्यातील पहिली विकेट घेत जडेजाने ‘हा’ रेकॉर्ड केला ब्रेक, हरभजनला पछाडलं
जो रूट एक्सप्रेस सुस्साट! इंग्लंडच्या कर्णधाराचे तुफानी शतक; मोडला मियाँदादचा रेकॉर्ड