---Advertisement---

‘सर सचिन, लारा, गॅरफिल्ड की रिचर्डसन, कोण घेणार आहे वॉर्नरची जागा?’ माजी भारतीय दिग्गज संतापला

---Advertisement---

समरायझर्स हैदराबाद संघाचा दिग्गज शिलेदार डेविड वॉर्नर सध्या कठीण परिस्थितींचा सामना करत आहे. २०१६ साली आपल्या नेतृत्त्वाखाली त्याने हैदराबादला पहिले जेतेपद जिंकून दिले होते. परंतु या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यांतील खराब कामगिरीमुळे त्याची नेतृत्त्वपदावरुन हकालपट्टी करण्यात आली आहे.

एवढेच नव्हे तर, त्यापुढील सामन्यात त्याला प्लेइंग इलेव्हनमध्येही जागा मिळाली नाही. यानंतर चाहत्यांसह आजी-माजी क्रिकेटपटूंनी हैदराबादवर टीकेचा हल्लाबोल केला आहे. यात माजी भारतीय फिरकीपटू मुरली कार्तिक यानेही उडी घेतली आहे. वॉर्नरची जागा इतर कोणत्या खेळाडूला देणे, हे ‘आश्चर्यकारक आणि असमंजस’ असल्याचे त्याने म्हटले आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर कार्तिकने लिहिले आहे की, ‘वॉर्नरला संघाबाहेर करण्याचा निर्णय आश्चर्यकारक आणि असमंजस होता. तो संघबांधणीत फिट बसत नव्हता, असे तुम्ही म्हणता. खरोखरच का आणि तेही असे अचानक. तो तुमचा सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. आयपीएलच्या श्रेयस्कर खेळाडूंपैकी एक आहे. त्याने कित्येक वर्षे तुमच्या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मग अचानक तो तुमच्या संघासाठी अयोग्य कसा झाला.’

‘म्हणजे तुम्ही असे म्हणत आहात की, तुम्ही एखाद्याला (वॉर्नर) बालवाडीपासून मोठे होताना पाहिलंय आणि अचानकच तुम्हाला त्याला समजून घेण्यात अडचण येत आहे. कधीपासून वॉर्नर तुमच्या संघ संयोजनात बसेनासा झाला आहे. मग वॉर्नरला बाहेर केल्यानंतर त्याचा पर्यायी खेळाडू म्हणून तुम्ही नक्की कोणाला खेळवत आहात. सर सचिन किंवा लारा, सर गॅरफिल्ड की सर विव, कोण आहे त्याचा बदली खेळाडू?,’ असे कार्तिकने पुढे म्हटले आहे.

वॉर्नरची आयपीएलमधील फलंदाजी आकडेवारी अतिशय प्रशंसनीय राहिली आहे. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज आहे. याबरोबरच या लीगमध्ये ५० वेळा अर्धशतक झळकावणारा आणि ३ वेळा ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा करणाऱ्याला दिली जाते) जिंकणारा तो एकमेव फलंदाज आहे. या हंगामातही ६ सामने खेळताना त्याने १९३ धावा चोपल्या आहेत. तरीही त्याला राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात संघाबाहेर केल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कोरोनाची बाधा झालेला चक्रवर्ती का गेला होता बायो बबलच्या बाहेर? कारण आले पुढे

आयपीएलला कोरोनाने घेरले; बीसीसीआयने तयार केला बॅकअप प्लॅन, ‘या’ शहरात होतील पुढील सामने?

केकेआरच्या खेळाडूवर कोसळला संकटाचा डोंगर, आधी टीममेट कोरोना पॉझिटिव्ह; मग जवळच्या नातेवाईकाने निधन

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---