बीसीसीआयचे सचिव जय शाह आता आयसीसीचे अध्यक्ष बनले आहेत. वयाच्या 35व्या वर्षी हे पद सांभाळून शाह यांनी नवा इतिहास रचला. ते आयसीसीचे सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत. जय शाह आयसीसी अध्यक्ष बनल्यानंतर साहजिकच प्रश्न उभा राहतो की त्यांच्याजागी बीसीसीआयचे सचिव कोण होणार? या शर्यतीत एक नाव सर्वात आघाडीवर आहे, ते म्हणजे रोहन जेटली यांचं.
रोहन जेटली सध्या दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. जय शाह यांच्यानंतर ते बीसीसीआयचे सचिव बनू शकतात. 35 वर्षीय रोहन जेटली दिवंगत भाजपा नेते रोहन जेटली यांचे पुत्र आहेत. ते 2020 मध्ये सर्वप्रथम दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले. यानंतर 2023 मध्ये त्यांची पुन्हा बिनविरोध निवड झाली.
रोहन जेटली यांनी कायद्याची पदवी घेतली आहे. त्यांनी प्रतिष्ठित कॉर्नेल विद्यापिठातून मास्टर ऑफ लॉ (एलएलएम) केलं. ते सध्या दिल्लीत वकिलीची प्रॅक्टिस करतात. त्यांनी सर्वोच्च न्यायालय आणि दिल्ली उच्च न्यायालयात केसेस लढवल्या आहेत. दिल्ली उच्च न्यायालयानं मार्च 2024 मध्ये जेटली यांना केंद्र सरकारचे स्थायी वकील म्हणून नियुक्त केलं होतं.
रोहन जेटली यांचं नाव आघाडीवर का? –
(1) रोहन जेटली दिग्गज दिवंगत भाजपा नेते अरुण जेटली यांचे पुत्र आहेत. अरुण जेटली यांची बीसीसीआयमध्ये चांगली पकड होती. त्यामुळे रोहन जेटली यांचा दावा मजबूत आहे.
(2) रोहन जेटली 2 वेळा दिल्ली क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष बनले आहेत. त्यांच्याकडे खेळातील प्रशासनाचा उत्तम अनुभव आहे. त्यांच्या नेतृत्वात दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियममध्ये 2023 विश्वचषकाचे 5 सामने आयोजित करण्यात आले होते.
(3) रोहन जेटली यांच्या नेतृत्वात दिल्ली प्रीमियर लीगचं (DPL) देखील आयोजन करण्यात आलं होतं. या लीगमध्ये रिषभ पंत, इशांत शर्मा, यश धूल, आयुष बदोनी आणि ललित यादव यांसारख्या अनेक स्टार खेळाडूंनी सहभाग नोदवला होता.
हेही वाचा –
जय शाह आयसीसी अध्यक्ष बनले, आता बीसीसीआयचे सचिव कोण होणार? हे 3 नावं आघाडीवर
महिला, अपंग आणि कसोटी क्रिकेटमध्ये होणार मोठा बदल! ICC अध्यक्ष जय शहांची पहिली प्रतिक्रिया
संपुर्ण यादीः आयसीसीचे आजपर्यंतचे भारतीय प्रमुख, जय शहा सर्वात तरुण