बुधवारी (दि. 8 मे) सनराझर्स हैद्राबाद विरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाचा मोठा दारून पराभव झाला. आयपीएल इतिहासातील लखनऊचा हा सर्वात लाजीरवाणा पराभव होता.
लखनऊच्या या पराभवामुळे संघाचे मालक संजीव गोयंका हे भलतेच चिडले होते. त्यांचा राग सामना संपल्यानंतर सर्वांनाच पाहायला मिळाला. एका व्हायरल व्हिडिओमध्ये गोएंगा हे केएल राहुलवर मैदानावरच भडकताना दिसतायते. संघाच्या लाजीरवाण्या पराभवाबद्दल ते केएल राहूलला जाब विचारताना दिसतायेत. पण हे संजीव गोएंगा कोण आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? खास बाब म्हणजे त्यांनी यापुर्वी एका एमएस धोनीलाही कर्णधारपदावरून काढले होते. ( Who is Sanjiv Goenka LSG owner on-camera scolding of KL Rahul goes viral )
लखनऊ सुपर जायंट्स संघाने 2022 मध्ये आयपीएलमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून केएल राहुल संघाचा कर्णधार आहे. संजीव गोयंका हे देशातील प्रसिद्ध उद्योगपती आहेत, ते लखनऊ सुपर जायंट्सचे मालक आहे. त्यांच्या मालकीची कंपनी RPSG ग्रुपने ऑक्टोबर 2021 मध्ये 7.090 कोटी रुपयांची बोली लावून लखनऊ सुपर जायंट्स फ्रँचायझी खरेदी केली होती.
गोयंका हे क्रिकेटसोबकच पॉवर आणि एनर्जी, कार्बन ब्लॅक मॅन्युफॅक्चरिंग, रिटेल, आयटी सेवा, एफएमसीजी, मीडिया, मनोरंजन आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहे. या समूहाच्या 23 पेक्षा जास्त कंपन्या आहेत आणि 44,500 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. संजीव गोयंका हे दुसऱ्यांदा आयपीएलमध्ये परतले आहेत. 2016 आणि 2017 मध्ये गोयंका यांच्या मालकीचा रायझिंग पुणे सुपर जायंट्स हा संघ मैदानात होता. तेव्हा त्यांनी धोनीला कर्णधार पदावरून दूर करत स्टिव्ह स्मिथला कर्णधार केले होते.