भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार फलंदाज स्मृती मंधाना तिच्या खेळासोबतच सौंदर्यासाठीही चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. ‘नॅशनल क्रश’ समजल्या जाणाऱ्या स्मृती मंधानाची लव्ह लाईफ कोणापासूनही लपून राहिलेली नाही. आता तिनं आपलं नातं उघड केलं आहे. स्मृती गेल्या 5 वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहे आणि तिनं 7 जुलै 2024 रोजी तिच्या बॉयफ्रेंडसोबत हा दिवस साजरा केला.
स्मृती मंधानाच्या बॉयफ्रेंडचं नाव पलाश मुच्छाल आहे. इंटरनेटवर स्मृतीच्या बॉयफ्रेंडची बरीच चर्चा आहे. हे दोघेही सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो पोस्ट करत असतात. स्मृतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून पलाशनं चाहत्यांना त्यांच्या नात्याला 5 वर्ष पूर्ण झाल्याची माहिती दिली. पलाशनं रविवारी (7 जुलै) इंस्टाग्रामवर स्मृतीसोबत केक कापतानाचा फोटो पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये 5 असं लिहिलं. सोबत लाल रंगाच्या हार्टचा इमोजी देखील जोडला आहे. याचाच अर्थ या दोघांच्या नात्याला 5 वर्ष पूर्ण झाली आहेत.
View this post on Instagram
पलाश मुच्छाल हा मध्य प्रदेशातील इंदूरचा रहिवासी आहे. तो व्यवसायाने गायक आणि संगीतकार आहे. तो बॉलिवूड चित्रपट आणि जाहिरातींसाठी गाणी गातो. त्याची मोठी बहीण पलक मुच्छाल ही देखील प्रसिद्ध गायिका आहे. पलाश आणि स्मृती एकमेकांना खूप दिवसांपासून ओळखतात. एकदा पलाश स्मृतीला तिच्या 27व्या वाढदिवसाला सरप्राईज देण्यासाठी ढाकाला गेला होता. स्मृतीची टीम आरसीबीनं WPL 2024 चे विजेतेपद जिंकल्यानंतर तिचे आणि पलाशचे फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाले होते. पलाशनं स्मृतीला मैदानातच मिठी मारली आणि तिचं अभिनंदन केलं होतं. त्यानं स्मृतीच्या खांद्यावर हात ठेवून ट्रॉफीसोबत फोटोही काढला होता.
पलाश मुच्छाल यानं एका लाइव्ह कॉन्सर्टमध्ये स्मृतीला गाणं समर्पित करत आपलं प्रेम व्यक्त केलं होतं. स्मृती मंधाना सध्या चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघाविरुद्ध टी20 मालिका खेळत आहे. ती सध्या जबरदस्त फार्मात असून तिनं नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिका आणि कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या –
किलर यॉर्कर… बुमराह इतकाच घातक! या खतरनाक गोलंदाजाला टीम इंडियात गेल्या 3 वर्षांपासून संधी मिळत नाहीये
जय शाह आता अधिक शक्तिशाली होणार! बीसीसीआयमधून आयसीसीमध्ये जाण्याच्या चर्चांना वेग
जेम्स अँडरसन कारकिर्दीतील शेवटच्या कसोटीत रचणार इतिहास! अशी कामगिरी करताच बनेल मोठा विक्रम