क्रिकेट चाहते नेहमीच आपल्या लाडक्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी नेहमीच उत्सुक असतात. आपला आवडता क्रिकेटपटू दिसताच, त्याच्यासोबत फोटो काढण्याचा मोह चाहत्यांना आवरत नाही. त्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर कदाचित ते सोशल मीडिया स्टारही बनतात. असेच काहीसे विराट कोहली याच्या चाहतीसोबतही घडले. सध्या तिचीच चर्चा सर्वत्र रंगली आहे.
भारतीय संघ टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. यावेळी भारतीय संघ इतर संघांच्या तुलनेत काही दिवसांआधीच ऑस्ट्रेलियात पोहोचून सराव करत आहे. यावेळी नवीन नियमांनुसार, सर्व संघांना कोरोनापासून वाचण्यासाठी कोरोनाशी निगडीत कडक नियमांचे पालन करावे लागत नाहीये. याचा फायदा खेळाडूंसोबतच भारतीय चाहत्यांनाही होत आहे. ऑस्ट्रेलियात भारतीय संघाचे अनेक खेळाडू त्यांच्या चाहत्यांशी भेटत आहेत.
अनेक चाहत्यांनी आपल्या आवडत्या क्रिकेटपटूसोबत फोटो काढले आहेत. अनेक चाहत्यांनी हे फोटो सोशल मीडियावरही शेअर केले आहेत. मात्र, एक मुलगी सोशल मीडियावर भलतीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याच्यासोबत दिसत आहे.
कोण आहे व्हायरल होत असलेली मुलगी?
खरं तर, भारतीय संघ जेव्हा ब्रिस्बेनमध्ये होता, तेव्हा विराटसोबत एका मुलीने फोटो क्लिक केले होता. तसेच, इंस्टाग्रामवरही शेअर केला होता. या मुलीचे नाव अमीषा बसेरा (Ameesha Basera) असे आहे, जी ऑस्ट्रेलियामध्येच राहते. 21 वर्षीय अमीषाने विराटसोबतचा फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे, जो भलताच व्हायरल होत आहे. अमीषा मूळची भारतीय आहे. तिने युनिव्हर्सिटी ऑप क्वीन्सलँड येथून इंजीनिअरिंग केली आहे. तिने विराटसोबतचा फोटो शेअर करत लिहिले की, “ही भावना शब्दांच्याही पलीकडची आहे.”
विशेष म्हणजे, तिच्या इतर पोस्टला जेमतेम दोन-चार हजार लाईक्स मिळतात. मात्र, विराटसोबतच्या तिच्या या फोटोला तब्बल 60 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच, शेकडो चाहत्यांनी कमेंट्सचाही वर्षाव केला आहे. एकाने लिहिले आहे की, “तू खूप नशीबवान आहेस.” दुसऱ्या एकाने लिहिले की, “आम्ही तर ट्विटरवरून तुझी सुंदरता पाहायला आलो आहोत.” आणखी एकाने लिहिले की, “असं वाटतंय की, विराटच तुझा चाहता आहे.”
विराटसोबत फोटो काढल्यानंतर अमीषा सोशल मीडिया स्टार बनली आहे. तिच्या इंस्टाग्रामवरील फॉलोव्हर्सची संख्याही झपाट्याने वाढली आहे. तिला इंस्टाग्रामवर 32.7 हजारांहून अधिक चाहते फॉलो करतात.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘बाकीचे खेळाडू काय छोले विकायला गेले होते का?’, विश्वचषकाच्या प्रश्नावर भडकला पाकिस्तानी दिग्गज
जरा इकडे पाहा! प्रत्येक विमानतळावर सूर्यकुमार कसा काढतो फोटो? रोहितने नक्कलच करून दाखवली