माजी क्रिकेटपटू इरफान पठाण याने भारतीय संघाच्या पुढील कर्णधाराबाबत भारतीय क्रिकेट संघ व्यवस्थापनाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. संघ व्यवस्थापनाने आतापासूनच पुढील कर्णधाराची तयारी सुरू करावी, असे मत इरफान पठाण यानी व्यक्त केले आहे. रोहित शर्मा याच्यानंतर पुढचा कर्णधार कोण असेल याचा विचार संघाने करायला हवा, असे पठाण म्हणाला.
रोहित शर्मा (Rohit Sharma) काही काळापासून तिन्ही फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एकदिवसीय विश्वचषक, टी20 विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे अंतिम सामनेही खेळले. मात्र, आता रोहित शर्मा हळूहळू कारकिर्दीच्या शेवटाकडे जात आहे, अशा परिस्थितीत संघाला आतापासूनच पुढचा कर्णधार तयार करावा लागणार आहे.
इरफान पठाण (Irfan Pathan) याच्या मते, भारतीय संघाचे यंदाचे लक्ष भावी कर्णधाराला तयार करण्यावर असले पाहिजे. माध्यमांशी बोलताना इरफान म्हणाला, “यावर्षी संघात अनेक बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच दोन-तीन जण तयार केले तर अडचणींचा सामना करावा लागणार नाही. आपण कोणत्या प्रकारचा खेळाडू तयार कराल यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. विराट कोहली (Virat Kohli) याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पाच वर्षे कसोटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली. संघ पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे आणि विराट कोहलीचा फिटनेसही जबरदस्त आहे. कोहलीने प्रत्येक सामन्यात चांगली कामगिरी करत संघाला चांगली कामगिरी करायला लावली. रोहित शर्मानेही संघाकडून उत्कृष्ट कामगिरी केली. हे आम्ही विश्वचषक आणि आशिया चषकात पाहिलं पण रोहित शर्मानंतर कर्णधार कोण असेल याचा विचार करायचा आहे.”
अलीकडच्या काळात केएल राहुल (KL Rahul) आणि हार्दिक पंड्या (Hardik Pandya) यांच्याकडे कर्णधारपद देण्यात आले आहे. या खेळाडूंनी अनेकवेळा संघाचे नेतृत्व केले आहे. (Who is the captain after Rohit Sharma? Irfan Pathan gave valuable advice to Team India)
हेही वाचा
IND vs SA: टीम इंडियाच्या इज्जतीचा प्रश्न; दुसऱ्या कसोटीत रोहित शर्माला ‘हा’ निर्णय घेणे पडू शकते भाग
नेथन लायनबद्दल माजी दिग्गजाची मोठी भविष्यवाणी, म्हणाला, ‘मला आशा आहे की तो माझा…’