एकीकडे भारतीय क्रिकेट संघ मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी२० मालिका खेळण्यात व्यस्त आहे. तोच दुसरीकडे भारतीय संघाचा अजून एक ताफा इंग्लंडमध्ये सराव करत आहे. इंग्लंडमध्ये भारतीय संघाला १ जुलैपासून ऍजबस्टन येथे पुनर्निधारीत पाचवा कसोटी सामना खेळायचा आहे, जो कारानामुळे स्थगित करण्यात आला होता. या सामन्यासाठी भारतीय खेळाडू सराव करत असलेले काही फोटो बीसीसीआयने (भारतीय क्रिकेट नियामक मंडळ) सोशल मीडियावर शेअर केले होते, ज्यानंतर एका व्यक्तीला ओळखणे, चाहत्यांसाठी कठीण झाले आहे.
२०२१ मध्ये भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर (India Tour Of England) ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. या मालिकेत ४ सामन्यांनंतर भारतीय संघ २-१ ने आघाडीवर होता. मात्र कोविड-१९ मुळे पाचवा आणि निर्णायक सामना होऊ शकला नव्हता. आता जवळपास वर्षभरानंतर इंग्लंडविरुद्धच्या या सामन्याचा मुहुर्त लागला आहे. अशात हा सामना जिंकत मालिका नावावर करण्यावर भारतीय संघाचे लक्ष असेल. तर इंग्लंडचा संघ सामना जिंकत मालिका बरोबरीत आणण्यासाठी प्रयत्न करेल.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या हंगामाअंतर्गत होत असलेल्या या सामन्यासाठी भारतीय संघ तयारीला लागला आहे. १७ जून रोजी भारतीय खेळाडूंचे इंग्लंडमध्ये सराव करतानाचे फोटो बीसीसीआयने ट्वीटरवर शेअर केले होते. या फोटोंमध्ये विराट कोहली, रविंद्र जडेजा, जसप्रीत बुमराह आणि उमेश यादवसारखे वरिष्ठ खेळाडू सराव करताना दिसले. तसेच भारतीय संघात पुनरागमन करत असलेल्या चेतेश्वर पुजाराचाही यात समावेश होता.
Out and about in London🏃🏃#TeamIndia pic.twitter.com/NtOmK2XbsV
— BCCI (@BCCI) June 17, 2022
पुजाराव्यतिरिक्त प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, शुबमन गिल, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि हनुमा विहारीही दिसले. परंतु विराटसोबत (Virat Kohli) पुढे धावत असलेल्या एका व्यक्तीने चाहत्यांना गोंधळात टाकले. काहींनी तो भारताचा मर्यादीत षटकांच्या संघातील सलामीवीर इशान किशन असल्याचे म्हटले. तर काहींनी प्रियांक पांचाळ असल्याचे म्हटले.
What is ishan kishan doing here pic.twitter.com/J86kSLoz4K
— Titu (@TituTweets_) June 17, 2022
https://twitter.com/Rksayzz/status/1537764665815539713?s=20&t=c1Y7Qs0pNyJUqprxZH3a3g
परंतु ती व्यक्ती इशान किंवा प्रियांक नसून, भारतीय संघाचे नवीन स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक सोहम देसाई (Soham Desai) हे आहेत. त्यांनी नुकतेच शंकर बसू यांचे स्थान घेतले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
INDvsSA | कर्णधार म्हणून कोहली, धोनीकडूनही जे नाही झाले; ते करत इतिहास रचणार रिषभ पंत
‘अजून खूप क्रिकेट खेळायचंय!’, रोहितने कार्तिकला दिलेला जुना सल्ला होतोय व्हायरल
विषय आहे का! मुंबईने विक्रमी ४७व्यांदा गाठली फायनल, अंतिम सामन्यात ‘या’ संघाचे आव्हान