रोहित शर्मा (Captain Rohit Sharma) याच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ शानदार प्रदर्शन करतो आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारतीय संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांमध्ये अजेय राहिला आहे. सोमवारी (१४ मार्च) भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला दुसरा कसोटी सामना भारतीय संघाने २३८ धावांनी जिंकला. तत्पूर्वी मोहाली येथे झालेला पहिला कसोटी सामना भारताने एक डाव आणि २२२ धावांनी जिंकला होता. अशाप्रकारे भारतीय संघाने श्रीलंकेला २ सामन्यांच्या कसोटी मालिकेत २-० ने व्हाईटवॉश दिला आहे.
मालिका विजयानंतर कर्णधार रोहितने भारतीय संघाची दीर्घकाळापासून चालत आलेली परंपरा जपल्याचे दिसले. त्याने मालिका विजयानंतर संघातील सर्वात नव्या सदस्यांच्या हाती ट्रॉफी सोपवली आणि त्यांना फोटो सेशनवेळीही मध्यभागी उभे केले. ते भाग्यवान नवे सदस्य होते प्रियांक पांचाळ आणि सौरभ कुमार. यातीलच सौरभ कुमार (Saurabh Kumar) बाबत आपण या लेखातून (Saurabh Kumar Special Story) जाणून घेणार आहोत….
CHAMPIONS #TeamIndia @Paytm #INDvSL pic.twitter.com/GhLlAl1H0W
— BCCI (@BCCI) March 14, 2022
आयपीएल लिलावात नव्हती मिळाली पसंती
अष्टपैलू खेळाडू असलेला सौरभ आयपीएल २०२२ लिलावात सहभागी होता. मात्र, त्याला कोणत्यात फ्रँचायझीने पसंती दाखवली नव्हती. त्यामुळे तो आयपीएल २०२२ साठी कोणत्याच संघात सामील नाही. त्याची २० लाख मुळ किंमत होती.
असे असले तरी, सौरभ यापूर्वी २०१७ साली रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाचा आणि २०२१ मध्ये पंजाब किंग्स संघाचा भाग होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये प्रभावशाली कामगिरी
बागपत येथील रहिवासी असलेल्या सौरभने आपल्या कामगिरीने भारताच्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये छाप पाडलेली आहे. तो भारताच्या देशांतर्गत क्रिकेट वर्तुळात चांगली ओळख असलेला खेळाडू आहे. त्याने सर्विसेस आणि उत्तरप्रदेशकडून देशांतर्गत क्रिकेट खेळले आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २०१४ साली सर्विसेसकडून हिमाचल प्रदेशविरुद्ध पदार्पण केले होते. त्यानंतर त्याने उत्तर प्रदेशकडून खेळणे सुरू केले. त्याने उत्तरप्रदेशकडून खेळताना अ दर्जाच्या आणि टी२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले.
https://www.instagram.com/p/CbHGkoTrssR/?utm_source=ig_web_copy_link
त्याने आत्तापर्यंत ४६ प्रथम श्रेणी क्रिकेट सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने २९.११ च्या सरासरीने १५७२ धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २ शतकांचा आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर त्याने ४६ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये १९६ विकेट्सही घेतल्या आहेत. त्याने १६ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेण्याची कामगिरी केली आहे. त्याचबरोबर ६ वेळा एका सामन्यात १० विकेट्स घेण्याचाही पराक्रम त्याने केला आहे.
https://www.instagram.com/p/CZj2-eJvzwB/?utm_source=ig_web_copy_link
सौरभने २५ अ दर्जाचे सामने देखील खेळले असून त्यात १७३ धावा केल्या आहेत, तर ३७ विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याला ३३ टी२० सामने खेळण्याचाही अनुभव असून यात त्याने १४८ धावा केल्या आहेत आणि २४ विकेट्स घेतल्या आहेत. सौरभ डावखरी फिरकीपटू आहे. तसेच डाव्या हातानेच फलंदाजी देखील करतो.
भारतीय अ संघाकडून खेळलाय सौरभ
सौरभचा दक्षिण आफ्रिका २०२१-२२ दौऱ्यासाठी भारताच्या अ संघातही समावेश होता. मात्र, त्याला त्या दौऱ्यात खास कामगिरी करता आली नव्हती. त्याने २ कसोटीत ४ विकेट्स घेतल्या होत्या आणि २३ धावा केल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या-
विजयरथावर स्वार कर्णधार रोहितची वाढली डोकेदुखी! ‘हा’ विस्फोटक फलंदाज पहिल्या सामन्याला मुकणार?
रोहित शर्माचे रिषभ पंतबद्दल मोठे वक्तव्य; म्हणाला, ‘काही क्षणात बदलू शकतो सामना, त्याला…’