भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहलने धक्कादायक खुलासा केला आहे. चहल सध्या आयपीएल २०२२मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. या संघातील सहकारी असलेल्या आर अश्विनसोबतच्या एका मुलाखतीदरम्यान त्याने आयपीएल २०१३ मध्ये घडलेल्या प्रकाराबद्दल सांगितले आहे. आयपीएल २०१३ मध्ये चहल मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. त्याने सांगितले की, एका खेळाडूने त्याला १५व्या मजल्याच्या बाल्कनीत टांगले होते. आता यावर भारतीय संघाचा माजी दिग्गज फलंदाज वीरेंद्र सेहवागने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
वीरेंद्र सेहवागने युझवेंद्र चहलला (Virender Sehwag And Yuzvendra Chahal) त्या खेळाडूचे नाव सांगण्यास सांगितले आहे, ज्याने दारूच्या नशेत त्याच्यासोबत असे लाजिरवाणे कृत्य केले होते.
यासोबतच त्याने सांगितले की, अशाप्रकारच्या घटना मजेत घेतल्या नाही पाहिजेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, त्या खेळाडूविरुद्ध त्यावेळी काय कारवाई करण्यात आली होती. याचाही खुलासा झाला पाहिजे. मात्र, काही वेळानंतर त्याने आपले ट्वीट डिलीट केले. त्याने ट्वीट करत लिहिले होते की, “दारूच्या नशेत चहलसोबत हे कृत्य करणाऱ्या खेळाडूचे नाव नमूद करणे आवश्यक आहे. खरे असेल तर तो विनोद मानता येणार नाही. त्याचे गांभीर्य लक्षात घेऊन काय झाले आणि काय कारवाई झाली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.”
सेहवागने हे ट्वीट करत मुन्ना भाई सीरिजच्या सिनेमातील एका सीनचा स्क्रीनशॉट शेअर केला होता. यामध्ये संजय दत्त एका व्यक्तीला छतावरून उलटे धरलेला दिसत आहे. दुसरीकडे चाहतेही चहलकडे त्या खेळाडूचे नाव सांगण्याची मागणी करत आहेत.
राजस्थानच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर झालेल्या व्हिडिओत युजवेंद्र चहल म्हणाला होता की, “मी हा प्रसंग कोणालाच सांगितला नाहीये, पण आता लोकांना याविषयी कळेल. ही आयपीएल २०१३ची गोष्ट आहे. जेव्हा मी मुंबई इंडियन्सचा भाग होतो. आमचा एक सामना बेंगलोरमध्ये होता. सामना संपल्यानंतर एक पार्टी होती. तेव्हा त्याठिकाणी एक विदेशी खेळाडू होता, जो पूर्णपणे दारूच्या शनेत होता. मी त्याचे नाव घेणार नाही. तो खूप जास्तच नशेत होता. खूप वेळापासून तो माझ्याकडे बघत होता, नंतर त्याने मला जवळ बोलावले.”
“त्या विदेशी खेळाडूने मला बाहेर नेले आणि १५व्या मजल्याच्या बालकनीत टांगले. माझे दोन्ही हात त्याच्या गळ्यात होते. जर माझी पकड थोडी ढिल्ली पडली असती, तर मी १५व्या मजल्यावर होतो. त्याठिकाणी खूप सारे लोक होते, ज्यांनी हा प्रसंग पाहिला. ते तात्काळ आले आणि प्रसंग कसातरी नियंत्रणात आणला. मी बेशुद्ध झालो, मग लोकांनी मला पाणी पाजले. त्यादिवशी मला समजले की, बाहेर जाताना आपण किती काळजी घेतली पाहिजे. ही एक अशी घटना होती, ज्यामध्ये माझा जीव जाता-जाता वाचला. कारण थोडी चूक झाली असती, तर खाली पडलो असतो,” असे चहल पुढे बोलताना म्हणाला.
Royals’ comeback stories ke saath, aapke agle 7 minutes hum #SambhaalLenge 💗#RoyalsFamily | #HallaBol | @goeltmt pic.twitter.com/RjsLuMcZhV
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 7, 2022
राजस्थानच्या या हंगामातील कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर राजस्थानने आतापर्यंत ३ सामने खेळले आहेत. त्यातील २ सामन्यात त्यांना विजय मिळाला आहे, तर एका सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला आहे. ते ४ गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहेत.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
मयंकच्या थंडावलेल्या बॅटमधून दिग्गजाला गुजरातविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा; म्हणाला, ‘आता वेळ आलीय…’
Maharashtra Kesari | मोठी बातमी! साताऱ्यात अवकाळी पाऊस, महाराष्ट्र केसरी स्पर्धा तात्पुरत्या स्थगित
Video: नॉर्कियाच्या वेगवान चेंडूवर डी कॉकने ठोकला विचित्र षटकार; पाहून तुम्हालाही फुटेल घाम