मुंबई। आज (५ जानेवारी) मुंबई येथे प्रो कबड्डी च्या सहाव्या हंगामाचा अंतिम सामना होणार आहे. बेंगळुरू बुल्स विरुध्द गुजरात फार्च्यूनजाएंट्स अशी अंतिम लढत होणार आहे. दोन्ही संघ दुसऱ्यांदा प्रो कबड्डीचा अंतिम सामना खेळत आहेत.
बंगळुरू बुल्सने झोन बी मध्ये गुणतालिकेत पहिला स्थान मिळवत होत. त्यानंतर क्वालीफायर १ सामना जिकुंन अंतिम प्रवेश मिळवला आहे. ते गुजरातने झोन ए मध्ये पहिला स्थान मिळवले होते. पण क्वालीफायर १ चा पराभव झाल्यामुळे क्वालीफायर २ मध्ये यूपी योद्धाचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे.
दोन्ही संघांनी प्रो कबड्डीच्या अंतिम सामन्यात दुसऱ्यांदा प्रवेश मिळवला आहे. दोन्ही संघानं उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. पण आज दोन्ही संघ अंतिम सामना एकमेकांना विरुद्ध खेळत असल्यामुळे एकाला विजेतेपद मिळणार एवढं नक्की त्यामुळे प्रो कबड्डीला नवीन चॅम्पियन टीम ही मिळणार.
बेंगळुरू बुल्समधील पवन शेरावत, रोहित कुमार, काशीलिंग अडके गुजरात मधील सचिन, के प्रपंजन, परवेश भैंस्वाल या खेळाडूंवर नजरा असतील.
प्रो कबड्डी पर्व ६ अंतिम सामना
बेंगळुरू बुल्स विरुध्द गुजरात फार्च्यूनजाएंट्स
वेळ: रात्री ८:०० वाजता
ठिकाण: मुंबई
महत्त्वाच्या बातम्या:
–प्रो कबड्डीच्या इतिहासात असा मोठा पराक्रम करणारा नितेश कुमार पहिलाच कबड्डीपटू
–“खेलो इंडिया युथ गेम्स २०१९” मधील कबड्डीचा कार्यक्रम जाहीर