सध्या भारतच नव्हे तर संपूर्ण जग कोरोना व्हायरसच्या विळख्यात सापडले आहेत. या व्हायरसमुळे मोठ-मोठ्या स्पर्धाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अधिकाधिक खेळाडू आपल्या परिवारासोबत वेळ घालवत आहेत.
परंतु भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसुद्धा (Mohammed Shami) असंच काहीतरी करत आहे. शमी आपल्या घरात वर्कआउट करण्याव्यतिरिक्त तो आपल्या पाळीव कुत्र्याबरोबर (जॅक) वेळ घालवत आहे.
शमीने नुकताच आपल्या कुत्र्याबरोबरचा फोटो आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो अनेक चाहत्यांना आवडला आहे. त्याचबरोबर काही चाहत्यांनी शमीच्या या फोटोवर विवादात्मक कमेंट केल्या आहेत.
Having the most amazing time with my lil buddy, Jack. pic.twitter.com/Ojiy5U8fwn
— 𝕸𝖔𝖍𝖆𝖒𝖒𝖆𝖉 𝖘𝖍𝖆𝖒𝖎 (@MdShami11) March 23, 2020
झाले असे की, शमी आपल्या कुत्र्याबरोबर घरातून बाहेर पडला होता. कोरोना व्हायरसपासून संरक्षण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार (Central & State Government) वारंवार लोकांना घरात राहण्याचे आवाहन करत आहेत. परंतु शमी घराबाहेर पडल्यामुळे त्याला अनेक चाहत्यांनी गद्दार म्हटले आहे.
परंतु शमी आपल्या घराच्या गार्डनमध्येच होता. एका चाहत्याने शमीवर कमेंट करत त्याला गद्दार म्हटले. कारण चाहत्याला वाटले की, कोरोना व्हायरस प्राण्यांमार्फत पसरतो. परंतु असे काही नाही. याव्यतिरिक्त अनेक चाहत्यांनी चांगल्या-वाईट प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-बीसीसीआयचं अध्यक्षपद कायम रहावं म्हणून गांगुलीसाठी या व्यक्तीने लावली फिल्डींग
-त्या १४ धावा अशा होत्या की सचिनने लगेच उंचावली होती बॅट
-घर फिरले की घराचे वासेही फिरतात, डेल स्टेनवर आली सर्वात मोठी वाईट वेळ