---Advertisement---

ॲडलेड कसोटीत वॉशिंग्टन सुंदरच्या जागी आर अश्विनला संधी का मिळाली? 3 प्रमुख कारणं जाणून घ्या

On: शुक्रवार, डिसेंबर 6, 2024 12:48 PM
---Advertisement---

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲडलेडच्या मैदानावर गुलाबी चेंडूनं दिवस-रात्र कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात पुनरागमन करताच कर्णधार रोहित शर्मानं प्लेइंग 11 संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यापैकी एक म्हणजे वॉशिंग्टन सुंदरला वगळून रविचंद्रन अश्विनचा संघात समावेश करणे.

न्यूझीलंडविरुद्ध घरच्या कसोटी मालिकेत वॉशिंग्टन सुंदरचं भारतीय संघात पुनरागमन झालं. त्यानं या संधीचा पुरेपूर फायदा घेतला होता. यानंतर त्याची बॉर्डर-गावस्कर मालिकेसाठी निवड झाली आणि तो पर्थ कसोटीत खेळला. त्याच्यामुळे अश्विनला पहिल्या कसोटीतून बाहेर बसावं लागलं होतं. मात्र, आता अश्विनला दुसऱ्या कसोटीत संधी मिळाली असून सुंदरला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. या लेखात आम्ही या सामन्यासाठी सुंदरला वगळून अश्विनला संधी का देण्यात आली यामागची तीन कारणं तुम्हाला सांगणार आहोत.

(3) वॉशिंग्टन सुंदर पर्थमध्ये छाप सोडू शकला नाही – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत वॉशिंग्टन सुंदरची कामगिरी फारशी चांगली नव्हती. फलंदाजीत त्यानं दोन्ही डावात मिळून एकूण 33 धावा केल्या होत्या. गोलंदाजीत त्याला पहिल्या डावात एकही बळी मिळू शकला नाही, तर दुसऱ्या डावात त्यानं केवळ 2 बळी घेतले होते.

(2) डावखुऱ्या फलंदाजांविरुद्ध अश्विनचा उत्कृष्ट रेकॉर्ड – रविचंद्रन अश्विन हा कसोटी क्रिकेटमध्ये डावखुऱ्या फलंदाजांचा कर्दनकाळ मानला जातो. अश्विननं कसोटीत 500 हून अधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी 268 विकेट डावखुऱ्या फलंदाजांच्या आहेत. ऑस्ट्रेलियन संघाकडे सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि ट्रॅव्हिस हेडच्या रूपानं दोन डावखुरे धोकादायक फलंदाज आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी अश्विनवर असेल.

(1) अश्विनची ॲडलेडमध्ये चांगली कामगिरी – रोहित शर्मानं अश्विनला ॲडलेडमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला, कारण या मैदानावर त्याचा कसोटी रेकॉर्ड चांगला आहे. या मैदानावर गेल्या 3 कसोटीत त्यानं 16 विकेट्स घेतल्या आहेत. कदाचित त्यामुळेच या सामन्यात रोहितला संधी मिळाली असावी.

हेही वाचा – 

IND vs AUS: ॲडलेड कसोटीत टीम इंडियाची अवस्था वाईट, पहिल्या सत्रात कांगारुंचा वरचढ
IND VS AUS; ॲडलेड कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी दंडावर काळी पट्टी का बांधली? कारण भावूक करणारं
स्टार्कशी पंगा नको रे बाबा! पर्थ कसोटीत स्लेज करणारा जयस्वाल पहिल्याच चेंडूवर बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---