---Advertisement---

पाकिस्तानी खेळाडू सराव सत्रातही क्रिकेट किटसोबत का घेऊन जातात राष्ट्रध्वज? कारण आहे अभिमानास्पद

On: गुरूवार, ऑक्टोबर 28, 2021 9:18 AM
---Advertisement---

बाबर आझमच्या नेतृत्त्वाखालील पाकिस्तान संघ सध्या चर्चेत आहे. सुरुवातीला कट्टर प्रतिद्वंद्वी भारतीय संघ आणि त्यानंतर बलाढ्य न्यूझीलंडला पराभूत करत त्यांनी क्रिकेटप्रेमींवर आपली वेगळी छाप सोडली आहे. अशात पाकिस्तानचे क्रिकेटपटू मोहम्मद रिझवान आणि शाहिन शाह आफ्रिदी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ त्यांच्या सराव सत्रातील असून यामध्ये त्यांनी दाखवलेले देशप्रेम चाहत्यांचे आकर्षण ठरते आहे.

या व्हिडिओत रिझवान आणि आफ्रिदी सराव सत्रात जातेवेळी क्रिकेट किटबरोबरच पाकिस्तानचा राष्ट्रध्वजही सोबत घेऊन जाताना दिसत आहेत. त्यांच्या याच कृतीने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे.

पाकिस्तान क्रिकेट संघाचे प्रभारी मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताक यांनी यासंदर्भात खुलासा केला आहे. सराव सत्रात पाकिस्तानचे खेळाडू सोबत राष्ट्रध्वज का घेऊन जातात? याविषयी बोलताना मुश्ताक म्हणाले की, “हा संघ पूर्ण देशाचे प्रतिनिधित्व करतो आहे. त्यामुळे सराव सत्रात झेंडा सोबत घेऊन गेल्याने त्यांना सतत या गोष्टीची आठवण होत राहाते की, ते फक्त ११ जण नव्हे तर २२० मिलियन जण (संपूर्ण पाकिस्तानी रहिवासी) एकत्र आहेत.”

याबरोबरच आपल्या संघाच्या टी२० विश्वचषकातील यशस्वी कामगिरीबाबतही मुश्ताक बोलले. पाकिस्तानने सुरुवातीला भारतीय संघावर १० विकेट्सने ऐतिहासिक विजय मिळवला आणि टी२० विश्वचषकातील भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली आहे. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्यांनी न्यूझीलंडवर ५ विकेट्सने विजय मिळवत आपली विजयी लय कायम राखली आहे. पाकिस्तान संघाच्या या प्रगतीचा आपण आनंद लुट असल्याचे मुश्ताक म्हणाले आहेत.

“जिंकल्यानंतर कोणतीही योजना लागू करणे सोपे होते. आमचा संघ सकारात्मक दिशेकडे वाटचाल करतो आहे. संघातील सर्व खेळाडू समान मानसिकतेने एकत्र येऊन काम करत आहेत. खेळाडूंबरोबरच फलंदाजी सल्लागार मॅथ्यू हेडन आणि गोलंदाजी सल्लागार वर्नोन फिलेंदर यांचीही संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका राहिली आहे,” असे मुश्ताक यांनी सांगितले आहे.

महत्वाच्या बातम्या-

बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीचा ‘या’ पदावरुन राजीनामा, आयपीएलच्या २ नव्या संघांशी जोडलेले आहे प्रकरण

युनायटेडच्या स्पोर्ट्स क्लबच्या आदित्य राजहंसची दोन्ही डावात अष्टपैलू खेळी; संघाचा अंतिम फेरीत प्रवेश

वाचला ना गडी! पत्नीचा वाढदिवस विसरणे हाफिजला पडले असते महागात; सानियाने केली ‘अशी’ मदत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---