---Advertisement---

‘या’ ३ कारणांमुळे रोहितला टी२०चा कर्णधार बनवणे बीसीसीआयची मोठी चूक, नंतर होईल पश्चाताप!

On: शुक्रवार, सप्टेंबर 17, 2021 3:16 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने एका मोठ्या निर्णयाची घोषणा त्याच्या सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यामातून केली आहे. विराटने टी२० विश्वचषकानंतर भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. विराटच्या या निर्णयानंतर भारतीय टी२० संघाचा पुढचा कर्णधार कोण? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. असे असले तरीही, रोहित शर्मा भारताच्या टी२० संघाच्या कर्णधारपदासाठी प्रमुख दावेदार मानला जात आहे.

रोहित भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. तो भारताच्या टी२० आणि एकदिवसीय संघांचा उपकर्णधारही आहे आणि याच पार्श्वभूमीवर त्याला विश्वचषानंतर भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनवले जाऊ शकते.

तसेच विराटने नेतृत्व सोडण्याची माहिती देण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रातही रोहितच्या नावाचा उल्लेखही केला आहे. विराटने म्हटले आहे की, “मी या निर्णयाबाबत रवी भाई आणि रोहितसोबत माझ्या निर्णयाबाबत चर्चा केली होती.” यावरुन अनेकांना रोहितच्या भावी कर्णधार बनण्याच्या योजनेची चाहूल लागली आहे.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाने रोहितच्या नेतृत्वात पाच वेळा ट्राॅफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. मात्र, रोहितला जर टी२० संघाचा कर्णधार केले, तर ही बीसीसीआयची एक मोठी चूकही ठरू शकते. या लेखात आपण अशी ३ कारणे पाहणार आहोत, ज्यावर बीसीसीआयने रोहितला टी२०चे कर्णधारपद देण्यापूर्वी विचार करायला हवा.

रोहित सध्या झाला आहे ३४ वर्षांचा
विराटने राजीनामा दिल्यानंतर भारतीय टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्माला केले जाईल, असा सर्वांचा अंदाज आहे. मात्र, रोहितचे वय सध्या ३४ वर्ष असून त्याच्या फिटनेसकडे पाहता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अजून जास्त वर्षे खेळू शकणार नाही, असे दिसते. अशात जर त्याला सध्या भारतीय टी२० संघाचा कर्णधार बनवले गेले, तर काही काळानंतर पुन्हा भारतीय संघाचा कर्णधार बदलावा लागणार आहे. भारतीय संघाला सध्या अशा कर्णधाराची आवश्यकता आहे, जो दिर्घ काळापर्यंत संघाचे नेतृत्व करू शकेल.

आगामी विश्वचषकासाठी पुन्हा नव्याने कर्णधार शोधण्याची पडू शकते गरज
जर रोहित शर्माने टी२० संघाचे नेतृत्व स्वीकारले, तर तो अंदाजे पुढील दोन ते तीन वर्षांपर्यंत या पदावर कायम राहू शकतो. कारण त्याचे वय वाढत चालले आहे आणि तो सध्या ३४ वर्षाचा आहे. त्याची क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची वेळ काही लांब नाही. अशात त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर संघाला पुन्हा नवा कर्णधार निवडावा लागेल आणि परिणामी संघात स्थिरता राहणार नाही. २०२२ च्या विश्वचषकानंतर हे सांगणे कठीण होईल की, रोहित किती दिवस भारतासाठी खेळेल? त्याच्या निवृत्तीनंतर संघाला २०२४ च्या पुढच्या विश्वचषकासाठी अडचण निर्माण होऊ शकते. कारण संघाचा कर्णधार बदलल्यामुळे संघाचे संतुलन बिघडते, यात शंका नाही.

रोहित आणि विराटच्या मार्गदर्शनात घडवला जाऊ शकतो नवीन कर्णधार
बीसीसीआय विराट आणि रोहित व्यतिरिक्त संघातील इतर कोणत्यातरी खेळाडूला संघाचा कर्णधार बनवू शकते, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. अशात कोहली आणि रोहितव्यतिरिक्त भारतीय संघात केएल राहूल हा एक महत्वाचा खेळाडू आहे. तो क्रिकेटच्या तिन्ही फाॅरमॅटमध्ये खेळतो आहे आणि त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अनुभवही चांगला आहे. तो आयपीएलमध्ये पंजाब किंग्ज संघाचा कर्णधार आहे. अनेक दिग्गजांनी त्याला भारतीय संघाचा भविष्यातील कर्णधाराच्या रूपात पाहिले आहे. राहुल व्यतिरिक्त श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत हे देखिल भविष्यासाठी भारतीय कर्णधार बनण्यासाठी पात्र आहेत. जर बीसीसीआयने यांच्यातील कोणाला कर्णधार बनवले तर त्यांना पुढचे तीन किंवा चार वर्षे मार्गदर्शन देण्याचे काम रोहित आणि विराट यांचे असेल.

महत्त्वाच्या बातम्या-

‘कोहली धोनीच्या मार्गावर चालतोय, तो आता नव्या कर्णधारांना घडवेल’, बालपणीच्या कोचचा दावा

भारताला बरोबरीची टक्कर देण्यासाठी ‘या’ ११ खेळाडूंसह उतरेल पाकिस्तानचा संघ, पाहा संभाव्य प्लेइंग XI

‘तो’ देवदूतासारखा धावला, नाहीतर आज क्रिकेटर नव्हे पाणेपाणी विकणारा असतो; युवा शिलेदाराचा खुलासा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---