महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2011मध्ये वनडे विश्वचषक जिंकला होता. अशाप्रकारे भारताने तब्बल 28 वर्षांनंतर विश्वचषक उंचावण्याची कामगिरी करून दाखवली होती. या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकाविरुद्धच्या विजयाचा खरा शिल्पकार गौतम गंभीर होता. तसेच, एमएस धोनी याने वेगळ्या स्थितीत मैदानात पाऊल ठेवून महत्त्वाची खेळी साकारली होती. विशेष म्हणजे, सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत धोनी सांगतोय की, युवराज सिंग याला मागे ठेवत त्याच्या आधी पाचव्या क्रमांकावर स्वत: मैदानावर का आला होता.
काय म्हणाला धोनी?
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत 41 वर्षीय एमएस धोनी (MS Dhoni) याने युवराज सिंग (Yuvraj Singh) याच्या जागी फलंदाजीला येण्याबाबत भाष्य केले. त्याने खुलासा केला की, त्यावेळी श्रीलंकेचा फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन (Muttiah Muralitharan) गोलंदाजी करत होता, त्यामुळे तो युवराजच्या जागी स्वत: फलंदाजी करण्यासाठी आला.
मुरलीधरनमुळे घेतला निर्णय
धोनी म्हणाला की, “मी स्वत:ची बढती (युवराज आधी फलंदाजी) केली, कारण त्यावेळी मुथय्या मुरलीधरन गोलंदाजी करत होता.”
https://www.instagram.com/reel/CtmEH0ht4vC/?utm_source=ig_embed&ig_rid=ac0f5407-89e1-43f9-944a-aa27535819f1
धोनीने नुकताच पटकावला आयपीएल किताब
धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल 2023 हंगामाच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्स संघाचा पराभव करत किताब पटकावला. अशाप्रकारे धोनीही आयपीएलमध्ये 5 ट्रॉफी जिंकणारा कर्णधार बनला. त्याच्यापूर्वी रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स संघाने पाच आयपीएल ट्रॉफी आपल्या नावावर केल्या होत्या.
मुरलीधरननेही केलेला खुलासा
विशेष म्हणजे, युवराजआधी धोनी फलंदाजीला येण्याविषयी मुरलीधरननेही काही काळापूर्वी भाष्य केले होते. त्याच्यानुसार, धोनीला त्याचा सर्वात घातक चेंडू समजला होता. तो म्हणाला होता की, “आयपीएलमध्ये एकाच चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळण्यामुळे धोनीला माझी गोलंदाजी समजली होती. तसेच, युवराजला माझ्याविरुद्ध खेळण्यात अडचण यायची.”
सन 2011 विश्वचषकानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकणाऱ्या मुरलीधरनच्या मते मोजक्याच भारतीय खेळाडूंना त्याच्या घातक गोलंदाजीविरुद्ध खेळायला जमायचे. त्याच्यानुसार, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि गौतम गंभीर यांना त्याच्या घातक गोलंदाजीविरुद्ध तोडगा होता. वीरेंद्र सेहवागविषयी त्याला खात्री नव्हती.
खरं तर, ज्यावेळी मुरलीधरन तो चेंडू टाकायचा, तेव्हा गतीचा वापर करत नव्हता. त्यामुळे फलंदाजांना तो चेंडू खेळताना अडचण यायची. जोपर्यंत तुम्ही त्याचे मनगट पाहणार नाही, तोपर्यंत तुम्ही तो चेंडू खेळू शकत नव्हता. मुरलीधरन हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर वनडेत 534 विकेट्स आणि कसोटीत 800 विकेट्सची नोंद आहे. (why cricketer ms dhoni promoted himself ahead of yuvraj singh in 2011 world cup final revealed know here)
महत्वाच्या बातम्या-
बापरे बाप! विराट आहे 1000हून अधिक कोटींच्या संपत्तीचा मालक, पण कसा करतो एवढी कमाई?
बापलेकीचं प्रेम! शतक ठोकल्यानंतर मुलीला थेट पत्रकार परिषदेत घेऊन पोहोचला ख्वाजा, पुढे काय झालं पाहाच