भारतीय संघाने टी२० विश्वचषक स्पर्धेत विशेष कामगिरी केली नाही. विश्वचषकातील पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या दोन्ही महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला पराभवाचे तोंड पाहावे लागले होते. पण अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामीबियाविरुद्ध भारतीय संघाने चांगली कामगिरी करत स्पर्धेत परतण्याचा प्रयत्न केला होता. आता भारतीय संघ स्पर्धेबाहेर झाला आहे. या स्पर्धेनंतर भारतीय संघ न्यूझीलंड विरुद्ध टी२० मालिका खेळणार आहे. या टी२० मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून केएल राहुल याची नियुक्ती झाली आहे. केएल राहुलने नुकतेच इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केला आहे. ज्याची सगळीकडे चर्चा होत आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी उपकर्णधार म्हणून निवड झालेल्या केएल राहुलने नुकतेच इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्याने आपल्या नवीन सुरुवातीबद्दल सांगितले. अथिया शेट्टीने या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे. बऱ्याच दिवसांपासून राहुल आणि अथिया एकमेकांना डेट करत होते. नुकतेच राहुलने हे नाते स्वीकारले आहे. भारतीय संघाचा सामना १७ नोव्हेंबरपासून न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडच्या भारत दौऱ्यात तीन टी२० सामने आणि २ कसोटी सामने होतील.
इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना केएल राहुलने लिहिले- ‘आम्ही पुन्हा जात आहोत’. या फोटोला प्रत्युत्तर म्हणून अथियाने एक इमोजी टाकला, ज्याला उत्तर म्हणून राहुलने हार्ट इमोजी शेअर केला आहे. अलीकडेच अथियाच्या वाढदिवसानिमित्त केएल राहुलने खुलेपणाने आपले प्रेम व्यक्त केले आणि इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता.
स्कॉटलंडविरुद्धच्या सामन्यात अथिया शेट्टी रोहित शर्माची पत्नी रितिका सजदेहसोबत स्टँडमध्ये दिसली होती. दोघांचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. यापूर्वी अथिया शेट्टीही भारतीय संघासोबत इंग्लंड दौऱ्यावर गेली होती. दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे काहीही सांगितलेले नाही. राहुलने अलीकडेच अथियाच्या वाढदिवसानिमित्त अथियासोबतचा फोटो शेअर करत खाली कॅप्शनमध्ये माय लव्ह असे लिहिले होते, तेव्हापासून राहुलने त्यांचे नाते जवळजवळ स्पष्ट केले आहे. १७ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेत लोकेश राहुल उपकर्णधाराच्या भूमिकेत दिसणार आहे.