---Advertisement---

बर्मिंगहॅम टेस्टच्या पहिल्या दिवशी खेळाडूंनी का बांधली काळी पट्टी? जाणून घ्या कारण

---Advertisement---

भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना आजपासून (2 जुलै) बर्मिंगहॅम येथे सुरू झाला आहे. येथे इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाने 3 बदल केले आहेत. या सामन्याच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ आणि इंग्लिश संघ काळ्या पट्ट्या घालून मैदानात उतरले आहेत. हे पाहून सर्व चाहते हैराण झाले आहेत. आता कारण स्पष्ट करण्यात आले आहे. एका दिग्गज खेळाडूच्या सन्मानार्थ दोन्ही संघांनी काळ्या पट्ट्या घातल्या आहेत.

बर्मिंगहॅम कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ मैदानावर आला तेव्हा त्यांनी सर्वांनी काळ्या पट्ट्या बांधल्या होत्या. इंग्लंडचे माजी खेळाडू वेन लार्किन्स यांच्या सन्मानार्थ दोन्ही संघांनी असे केले आहे. काही दिवसांपूर्वी वेन लार्किन्स यांचे निधन झाले. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघांच्या खेळाडूंनी राष्ट्रगीतानंतर 2 मिनिटांचे मौन पाळले. वेन लार्किन्स यांनी इंग्लिश संघासाठी 13 कसोटी आणि 25 एकदिवसीय सामने खेळले. 1953 मध्ये जन्मलेल्या लार्किन्स यांचे 28 जून रोजी निधन झाले. यापूर्वी लीड्स कसोटी सामन्यादरम्यान दोन्ही संघांना 3 दिवस मैदानावर काळ्या पट्ट्या घालाव्या लागल्या होत्या.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---