---Advertisement---

सीएसकेविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर गौतम गंभीर चाहत्यांवर का चिडला, नवीन व्हिडिओ आला समोर

On: गुरूवार, मे 4, 2023 7:24 PM
Gautam Gambhir
---Advertisement---

विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यातील वादाच्या चर्चा अद्याप शांत झाल्याचे दिसत नाही. सोमवारी (1 मे) या दोन भारतीय दिग्गजांमध्ये वाद पाहायला मिळाला. आरसीबीने लखनऊच्या इकाना स्टेडियमवर 18 धावांनी विजय मिळवल्यानंतर मैदानातील वातावरण तापले होते. लखनऊ सुपर जायंट्सने बुधवारी (3 मे) इकाना स्टेडियमवर सलग दुसरा सामना खेळला. सीएसकेविरुद्धच्या या सामन्यातही विराटचे नाव घेताच गौतम गंभीरला राग आल्याचे पाहायला मिळाले.

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर समोवारी (1 मे) लखनऊ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आमने सामने होते. दोन्ही संघ या सामन्यात धावा करण्यासाठी झगडताना दिसले होते. लखनऊला विजयासाठी 127 धावा हव्या होत्या, पण संघ अवघ्या 108 धावांवर सर्वबाद झाला. या सामन्यातदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) चाहत्यांकडून पाहून खास इशारा करताना दिसला, जे गंभीरला खटकले. सामना संपल्यानंतर याच कारणास्तव गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि विराटमध्ये वाद झाल्याचेही सांगितले जाते.

https://twitter.com/EddyTweetzBro/status/1653977027991711746?s=20

विराटविषयी गंभीरच्या डोक्यातीर राग अद्याप सांत झाल्याचे दिसत नाहीये. बुधवारी (3 मे) इकाना स्टेडियमवर लखनऊ आणि चेन्नई सुपर किंग्जमधील सामना पावसामुळे अनिर्णित राहिला. सामना रद्द झाल्यानंतर गौतम गंभीर पवेलियमनध्ये परतत होता. मात्र, याच वेळी स्टॅन्डमध्ये उपस्थित चाहते गंभीरला चिडवण्यासाठी विराटचे नाव घेत होते. अशात पवेलियनमध्ये जात असलेल्या गंभीरने एक पाऊल मागे टाकत या प्रेक्षकांकडे रागात पाहिले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, गंभीर आणि विराट यांच्यातील वाद खऱ्या अर्थाने मागच्या बऱ्याच वर्षांपासून आहे. आयपीएल 2013 मध्ये विराट कोहली आणि गौतम गंभीर पहिल्यांदा एकमेकांशी भिडले होते. त्यावेली विराट रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, तर गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचे नेतृत्व करत होता. (Why Gautam Gambhir got angry with the fans after the match against CSK was cancelled, watch new video)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या विजयासाठी केकेआर-सनरायझर्सची झुंज! घरच्या मैदानावर हैदराबादची प्रथम गोलंदाजी
मुंबईच्या फलंदाजांनी अर्शदीपची केली वाताहात! टी20 तील सर्वात लाजिरवाणा विक्रम सिंगच्या नावे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---