जुलै 2024 मध्ये गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर असं मानलं जात होतं की, गंभीर आयपीएलप्रमाणे येथेही टीम इंडियाला जबरदस्त यश मिळवून देईल. परंतु संघ आतापर्यंत अपेक्षित कामगिरी करू शकलेला नाही.
गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियानं बांगलादेशविरुद्धची कसोटी मालिका 2-0 अशी जिंकली. परंतु त्यानंतर न्यूझीलंडनं घरच्या मैदानावर टीम इंडियाचा 3-0 असा पराभव केला. आता संघ ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेतही 1-2 ने पिछाडीवर आहे. म्हणजेच, गंभीरला आतापर्यंत खेळलेल्या 9 पैकी केवळ 3 कसोटी सामन्यांमध्ये विजय मिळवून देण्यात यश आलंय. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाला 5 सामन्यांमध्ये पराभव पत्कारावा लागला. आम्ही तुम्हाला या लेखात गौतम गंभीर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून यशस्वी का होत नाहीयेत, या मागची 3 कारणं सांगणार आहोत.
(3) वरिष्ठ खेळाडूंसोबत समन्वयाचा अभाव – मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांना कर्णधार रोहित शर्मा आणि अनुभवी फलंदाज विराट कोहली यांच्यासह संघातील वरिष्ठ खेळाडूंशी समन्वय राखता येत नाहीये. वरिष्ठ खेळाडू त्याचं ऐकत नसल्याची कबुली स्वतः गंभीरने दिली. गंभीरचा संघातील वरिष्ठ खेळाडूंशी ताळमेळ जुळत नसल्यानं संघाचं नुकसान होत असल्याचं आता स्पष्ट झालंय.
(2) कर्णधार आणि निवडकर्त्यांसोबत विचार जुळत नाहीये – जेव्हा गौतम गंभीर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक बनला, तेव्हा असं मानलं जात होतं की तो संघासाठी खूप प्रभावी ठरेल. परंतु त्याचे विचार कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्या जुळत नाहीयेत. गंभीरला एखाद्या खेळाडूचा संघात समावेश करायचा असेल, तर निवडकर्ते आणि कर्णधार त्याच्याशी सहमत नाहीत, तर कर्णधार आणि निवडकर्त्यांना एखाद्या खेळाडूचा संघात समावेश करायचा असेल तर गंभीर त्यांच्यीशी सहमत नाही. अशा प्रकारे ट्यूनिंग सेट न झाल्यामुळे परिस्थिती जास्त बिघडली आहे.
(1) खराब रणनीती – गौतम गंभीर गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय क्रिकेट संघासोबत काम करत असून, प्रशिक्षक म्हणून ही त्याची तिसरी कसोटी मालिका आहे. या काळात त्याच्याकडून काही आश्चर्यकारक निर्णय पाहायला मिळाले. गंभीरनं शुबमन गिलसारख्या महत्त्वाच्या फलंदाजाला मेलबर्न कसोटीतून वगळलं. याशिवाय आतापर्यंत ऑस्ट्रेलियातील प्रत्येक कसोटीत त्यानं वेगवेगळ्या फिरकीपटूंना संधी दिली, जी आश्चर्यकारक आहे. ही खराब रणनीती संघाला महागात पडली आहे.
हेही वाचा –
रिषभ पंतच्या बचावासाठी समोर आले संजय मांजरेकर, गावस्करांच्या टीकेला सडेतोड उत्तर!
रिषभ पंत सिडनी कसोटीतून बाहेर होणार? पाचव्या कसोटीत बदलू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11
2024 साली जगाचा निरोप घेणारे 5 दिग्गज क्रिकेटपटू, 3 भारतीयांचाही यादीत समावेश