रविवारी (28 ऑगस्ट) आशिया चषक 2022मधील बहुप्रतिक्षित सामना पार पडला. दुबईच्या मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान या क्रिकेटविश्वातील 2 कट्टर प्रतिस्पर्ध्यांमध्ये रोमहर्षल लढत झाली. या सामन्यात भारताने त्यांची पाकिस्तानवरील विजयी परंपरा कायम राखत 5 विकेट्सने सामना जिंकला. भारतीय संघाच्या या विजयाचे शिल्पकार राहिले अष्टपैलू हार्दिक पंड्या आणि वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार. पंड्याइतकेच भुवनेश्वरचेही संघाच्या विजयात योगदान राहिले. तरीही पंड्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. असे का?, याबद्दल सविस्तर जाणून घेऊ…
भुवनेश्वरच्या (Buvneshwar Kumar) प्रदर्शनाबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने प्रथम फलंदाजीस उतरलेल्या पाकिस्तानला 143 धावांवर रोखण्यात मोलाचे योगदान दिले. नेहमीप्रमाणे पाकिस्तानविरुद्ध धारदार स्पेल टाकत त्याने पाकिस्तानच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. 4 षटके फेकताना केवळ 26 धावा खर्च करत त्याने सर्वाधिक 4 विकेट्स काढल्या. त्यातही त्याला पाकिस्तानची सर्वात मोठी विकेट मिळाली, ती म्हणजे बाबर आझमची विकेट. भुवनेश्वरने आझमला 10 धावांवर अर्शदीप सिंगच्या हातून झेलबाद केले.
दुसरीकडे पंड्यानेही (Hardik Pandya) गोलंदाजीत चमकदार कामगिरी केली. त्याने आपल्या 4 षटकांमध्ये फक्त 25 धावा देत पाकिस्तानच्या 3 फलंदाजांना बाद केले. यामध्ये मोहम्मद रिझवानसारख्या मातब्बर फलंदाजांचाही समावेश आहे. पंड्याने रिझवानला 43 धावांवर झेलबाद करत अर्धशतक करण्यापासून रोखले.
Hardik Pandya is adjudged Player of the Match for his excellent all-round show as #TeamIndia win a thriller against Pakistan 👏🎉💥
Scorecard – https://t.co/o3hJ6VNfwF #INDvPAK #AsiaCup2022 pic.twitter.com/D7GnzdFmQf
— BCCI (@BCCI) August 28, 2022
मात्र गोलंदाजीत जरी भुवनेश्वर आणि पंड्याने बरोबरीचे प्रदर्शन केले असले तरीही, फलंदाजीत पंड्याने महत्त्वपूर्ण खेळी केली. शानदार गोलंदाजीनंतर पंड्याने फलंदाजीत फिनिशरची भूमिका निभावली. 17 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 33 धावांची झंझावाती खेळी त्याने खेळली. त्यातही सामना जिंकून देण्यासाठी त्याने 20व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मारलेला षटकार नेत्रदीपक ठरला.
अशाप्रकारे अष्टपैलू प्रदर्शनामुळे भुवनेश्वरऐवजी पंड्याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
देशप्रेमापोटी मेजर ध्यानचंद यांनी नाकारली होती चक्क हिटलरची ऑफर; वाचा त्यांच्याबद्दलच्या रोमांचक गोष्टी
…तुम्ही क्रिकेटमधील धावांप्रमाणे हाॅकीत गोल करता! ब्रॅडमन अन् ध्यानचंद यांच्या भेटीचा रोमांचक किस्सा
बदला पूर्ण! हार्दिक-जड्डूच्या तडाख्यात पाकिस्तान उडाली; आशिया कपमध्ये टीम इंडियाचा विजयी श्रीगणेशा