दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ नेहमीच जगातील सर्वात धोकादायक संघांपैकी एक मानला जातो. या संघाने जॅक कॅलिस, जॉन्टी रोड्स आणि एबी डिव्हिलियर्ससारखे अनेक जागतिक दर्जाचे खेळाडू दिले आहेत. तरीही, या संघाला अनेकदा ‘चोकर्स’ (दबावाखाली कामगिरी न करू शकणारा संघ) असं म्हटलं जातं. यामागचं नेमकं कारण काय? चला तर मग या बातमीद्वारे आपण जाणून घेऊया.
दक्षिण आफ्रिका हा जगातील सर्वोत्तम क्रिकेट संघांपैकी एक असला तरी, अनेकदा ते मोठ्या आणि महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये किंवा दबावाखाली खेळल्या जाणाऱ्या सामन्यांमध्ये अपयशी ठरतात. या संघाने आतापर्यंत फक्त एकच आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. 1998 मध्ये त्यांनी आयसीसी नॉकआउट ट्रॉफी/चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र, त्यानंतर सेमीफायनल आणि फायनलमध्ये पोहोचूनही त्यांना मोठ्या जेतेपदांपासून वंचित राहावे लागले आहे. (Why South Africa is called Chokers)
विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसारख्या स्पर्धांमध्ये, दक्षिण आफ्रिकेने अनेकदा सेमीफायनल आणि फायनल फेरी गाठली, पण बहुतेक वेळा त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. याचं ताजं उदाहरण म्हणजे गेल्या वर्षी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेला 2024च्या टी20 विश्वचषकाचा फायनल सामना. (2024 T20 World Cup Final) आफ्रिकेला शेवटच्या 5 षटकांत केवळ 30 धावांची गरज होती आणि त्यांच्या 6 विकेट्स शिल्लक होत्या. पण दबावाखाली दक्षिण आफ्रिकेचा संघ गडगडला आणि त्यांनी तो सामना 7 धावांनी गमावला. (World Cup Semi-finals South Africa)
दक्षिण आफ्रिकेचं नशीब मोठ्या स्पर्धांमध्ये नेहमीच वाईट ठरलं आहे. आतापर्यंत, 1992, 1999, 2015 आणि 2023च्या वनडे विश्वचषकांच्या सेमीफायनल फेरीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्याचप्रमाणे, 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्येही त्यांनी प्रवेश केला होता, परंतु न्यूझीलंडकडून त्यांना 50 धावांनी पराभव पत्करावा लागला. या सातत्यपूर्ण अपयशामुळेच दक्षिण आफ्रिकेला क्रिकेट विश्वात ‘चोकर्स’ म्हणून ओळखले जाते. (South Africa Cricket team chokers)






