भारतीय क्रिकेट संघाच्या चाहत्यांना ज्या गोष्टीची भीती होती, अगदी तीच गोष्ट शनिवारी (10 फेब्रुवारी) झाली. संघाची माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहली इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तिन्ही कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध नाहीये. भारतीय संघासाठी ही नक्कीच डोकेदुखी ठरू शकते.
शनिवारी बीसीसीआयने इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा केली. शेवटच्या तीन कसोटीं सामन्यांसाठी केएल राहुल (KL Rahul) आणि रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) या महत्वाच्या खेळाडूंचे संघात पुनरागमन झाले. पण स्टार फलंदाज विराट कोहली शेवटच्या तिन्ही कसोटींमध्ये खेळत नाहीये. विराटच्या कारकिर्दीत असे पहिल्यांदा झाले आहे, जेव्हा तो संपूर्ण कसोटी मालिकेसाठी संघासोबत नाहीये.
बीसीसीआयच्या माहितीनुसार, “विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे उर्वरित मालिकेसाठी उपलब्ध राहणार नाही. बीसीसीआय विराटच्या या निर्णयाचा आदर करते आणि समर्थन देखील देते.” दरम्यान, विराटने मागच्या वेळीप्रमाणे याही वेळी वैयक्तिक कारण सांगत मालिकेतून माघार घेतली आहे. इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध विराट न खेळण्याचे नेमके कारण अद्यावर समोर आले नाहीये.
Virat Kohli won’t be participating in the Test series against England due to personal reasons.
– Come back stronger, King …!!! 👑 pic.twitter.com/3BISk6e1fv
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 10, 2024
इंग्लंडविरुद्ध शेवटच्या तीन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, केएल राहुल*, रजत पाटीदार, सरफराज खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), केएस भरत (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन अश्विन, रविंद्र जडेजा*, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, आकाश दीप
इंग्लंड आणि भारत यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने झाले आहेत. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी भारतीय संघ आणि इंग्लंड संघ यांच्यात कांटे की टक्कर पाहायला मिळेल. या मालिकेतील तिसरा कसोटी सामना 15 फेब्रुवारी रोजी राजकोट येथे सुरु होईल. त्यानंतर रांचीमध्ये 23 फेब्रुवारी ते 27 फेब्रुवारी पर्यंत चौथा कसोटी सामना होईल. तर पाचवा आणि अंतिम कसोटी सामना धरमशाला येथील मैदानावर 07 मार्च रोजी सुरु होईल. (Why is Virat Kohli not playing against England? Read )
महत्वाच्या बातम्या –
BREAKING! इंग्लंडविरुद्ध तीन कसोटी सामन्यांसाठी टीम इंडियाची घोषणा, ‘या’ खेळाडूंची वापसी, पाहा संपूर्ण संघ
U19 Final IND vs AUS : U19 वर्ल्डकप फायनलआधी ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराचा रडीचा डाव, म्हणाला, “आम्हाला हे चॅलेंज…