अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी बीसीआयने नुकताच आपला 16 सदस्यीय संघ घोषित केला. या संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा या दिग्गज फलंदाजांचे पुनरागमन केला. पण ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या महत्वाच्या खेळाडूंना या मालिकेसाठी निवडण्यात आले नाही. आता या दोघांना अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेत न निवडण्याचे धक्कादायक कारण समोर आले आहे.
मागच्या काही आठवड्यांपासून असे सांगितले जात होते की, ईशान किशन (Ishan Kishan) मानसिक धकवा आल्यामुळे संघातून बाहेर आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून याच कारणास्तव माघार घेतली होती. असे असले तरी, ईशान दरम्यानच्या काळात दुबईमध्ये माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) याच्यासोबत पार्टी करताना दिसला. तसेच एका प्रसिद्ध टीव्ही क्वीज कार्यक्रमातही त्याने हजेरी लावली. आता भारतीय संघाचे निवडकर्ते ईशानच्या याच वर्तनावर नाराज असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळेच यष्टीरक्षक फलंदाजाला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी निवडले गेले नाही, असे सांगितले जात आहे.
टी-20 विश्वचषकातून ईशानचा पत्ता कट होणार?
आगामी टी-20 विश्वचषक जून महिन्यात सुरू होणार आहे. यावर्षी यूएसए आणि वेस्ट इंडीज यांच्याकडे विश्वचषकाचे यजमानपद असेल. ईशान किशन विश्वचषकाच्या दृष्टीने भारताचा महत्वाचा फलंदाज आहे. पण त्यासाठी ईशानला निवडकर्त्याची नाराजी दूर करावी लेगू शकते. मागच्या काही दिवसांमधील यष्टीरक्षक फलंदाजाचे वर्तन त्याला विश्वचषकात महागात पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
श्रेयस अय्यरला संघात न निवडण्याचे कारण –
अफगाणिस्तानविरुद्ध श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) खेळणेही अपेक्षित होते. पण त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत चार डावांमध्ये अवघ्या 41 धावा केल्या. अशात निवडकर्त्यांनी रणजी ट्रॉफीमध्ये खेळताना सल्ला दिला गेला होता. पण श्रेयसने निवडकर्त्यांचा सल्ला न ऐकता विश्रांतीला महत्व दिले. याच कारणास्तव त्याला अफगाणिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी दिली गेली नाही. असे असले तरी, श्रेयस आपली चूक सुधारण्यासाठी मुंबई रंणजी संघात सामील झाला आहे. 12 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या रणजी सामन्यात तो मुंबईसाठी खेळताना दिसेल.
What do you all make of this power-packed T20I squad set to face Afghanistan? 😎#TeamIndia | #INDvAFG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/pY2cUPdpHy
— BCCI (@BCCI) January 7, 2024
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघात विराट कोहली आणि रोहित शर्मा या फंलदाजांचे पुनरागमन होत आहे. या दोघांनी मागच्या 14 महिन्यांमध्ये एकही टी-20 सामना खेळला नाहीये. टी-20 विश्वचषक 2022च्या उपांत्य सामन्यात भारताला इंग्लंडकडून पराभव मिळाला होता. त्या पराभवानंतर हे दोन्ही दिग्गज टी-20 क्रिकेट खेळले नाहीत. पण यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकाच्या पार्श्वभूमीवर संघासाठी विराट आणि रोहित महत्वाची भूमिका पार पाडू शकतात.
महत्वाच्या बातम्या –
Rashid Khan । भारताविरुद्धच्या मालिकेतून राशिद खानची माघार, जाणून घ्या सरावाला सुरुवात केल्यानंतर का घेतला निर्णय?
धक्कादायक! खेळपट्टीवर धावताना फलंदाजाचे निधन, सहकाऱ्यांनी CPR देऊनही सोडले प्राण