यष्टीरक्षक सलामीवीर ईशान किशनसाठी गेले काही महिने चांगले गेले नाहीत. त्यानं टीम इंडियासाठी शेवटचा सामना नोव्हेंबर 2023 मध्ये खेळला होता. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर त्याची संघात निवड झाली होती, मात्र ईशाननं वैयक्तिक कारणांमुळे क्रिकेटमधून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला. यानंतर ईशाननं रणजी सामने खेळण्यास नकार दिला, ज्यामुळे त्याला बीसीसीआयचा केंद्रीय करार गमवावा लागला. आता ईशाननं या सर्व घटनांवर आपलं मौन सोडलं आहे.
भारताचे तत्कालीन मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटलं होतं की, जर ईशान किशनला भारतीय संघात पुनरागमन करायचं असेल तर त्याला देशांतर्गत क्रिकेट खेळावं लागेल आणि त्यात चांगली कामगिरी करावी लागेल. आता ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना ईशान म्हणाला की, तो रणजी ट्रॉफी खेळण्यासाठी योग्य मानसिक स्थितीत नव्हता.
ईशान म्हणाला, “मी क्रिकेटमधून ब्रेक घेतला होता. मात्र येथे एक नियम आहे की, जर तुम्हाला पुनरागमन करायचं असेल तर देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करावी लागेल. माझ्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणं खूप वेगळं होतं, कारण त्याचा काही उपयोग नव्हता. मी खेळण्याच्या मानसिक स्थितीत नव्हतो. त्यामुळेच मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेतला. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ब्रेक घेता आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळायला जाता, तर हे काहीच उपयोगाचं नाही. यापेक्षा तुम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटच खेळणं चालू ठेवा.”
ईशान पुढे बोलताना म्हणाला, “हे निराशाजनक होतं. आज सर्व काही ठीक आहे असं मला म्हणायचं नाही. हे माझ्यासाठी अजिबात सोपं नव्हतं. तुम्ही खूप काही सहन करता. माझ्या डोक्यात हे सतत चालू राहायचं की, काय होणार? असं माझ्या सोबतच का? या सगळ्या गोष्टी तेव्हा घडल्या, जेव्हा मी परफॉर्म करू शकत नव्हतो.”
महत्त्वाच्या बातम्या –
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचा मोठा निर्णय, या दिग्गज खेळाडूला बनवलं संघाचा मुख्य प्रशिक्षक
अभिषेक शर्मानं शुबमन गिलची बॅट उधार घेऊन ठोकलं शतक, काय आहे कारण?
टी20 विश्वचषक फायनलनं अवघ्या 24 तासात मोडले सर्व रेकॉर्ड! आयसीसीनं जाहीर केली आकडेवारी