न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात मोठा बदल करण्यात आला आहे. प्लेइंग 11 मध्ये जसप्रीत बुमराहच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला. भारतीय संघाला मालिकेत क्लीन स्वीप टाळायचा असेल, तर हा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे आवश्यक आहे. मात्र या सामन्यासाठी जसप्रीत बुमराहसारख्या गोलंदाजाला बाहेर केल्यामुळे चाहत्यांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. तुमच्या या प्रश्नांचं उत्तर आम्ही तुम्हाला या बातमीद्वारे देतो.
नाणेफेकीच्या वेळी कर्णधार रोहित शर्मानं जसप्रीत बुमराह प्लेइंग 11 मध्ये का नाही, याचं कारण सांगितलं. रोहित म्हणाला, आम्हाला माहित आहे की आम्ही मालिकेत चांगला खेळ केला नाही. वानखेडेची खेळपट्टी चांगली वाटत आहे. अपेक्षा आहे की आम्ही त्यांना लवकर आऊट करू. बुमराहची तब्येत सध्या चांगली नाही. त्यामुळे त्याच्या जागी मोहमम्द सिराज प्लेइंग 11 मध्ये आला आहे.”
बीसीसीआयनं देखील जसप्रीत बुमराहच्या तब्बेतीवर अपडेट दिलं आहे. बीसीसीआयनं सांगितलं की, बुमराहला व्हायरल इन्फेक्शन झालं आहे. यामुळे तो तिसऱ्या कसोटीसाठी उपलब्ध नाही.
जसप्रीत बुमराहनं या मालिकेतील 2 सामन्यात केवळ 3 विकेट घेतल्या आहेत. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया बॉर्डर-गावस्कर मालिकेला 22 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेसाठी बुमराहचं फिट राहणं अत्यंत आवश्यक आहे. या मालिकेसाठी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापतीमुळे संधी मिळालेली नाही. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह भारतीय गोलंदाजीचं नेतृत्व करेल.
मालिकेतील तिसऱ्या कसोटीसाठी न्यूझीलंडनं आपल्या संघात दोन बदल केले. दुसऱ्या कसोटीचा हिरो मिचेल सँटनर दुखापतीनं त्रस्त आहे. त्याच्या जागी ईश सोढी संघात आला. याशिवाय टीम साऊदीच्या जागी मॅट हेन्री प्लेइंग एलेव्हन मध्ये आला आहे.
हेही वाचा –
IND VS NZ; न्यूझीलंडचा टाॅस जिंकून फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
IPL 2025; रिषभ पंत, केएल राहुलपासून मोहम्मद शमी, श्रेयस अय्यरपर्यंत, मेगा लिलाव होणार अतिसुंदर
‘आम्हाला जिंकणाऱ्या मानसिकतेचे खेळाडू हवे होते’, संजीव गोएंकांनी अप्रत्यक्षपणे राहुलला सुनावलं?