ज्या गोष्टीची आपण सर्व आतुरतेने वाट पाहत होतो, ती गोष्ट म्हणजे विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे. हा सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात रंगणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३ वाजता चालू होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, वातावरणातील बिघाडामुळे सामन्याच्या पहिल्या दिवसाचे पहिले सत्र रद्द केले आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाने आपले अंतिम ११ खेळाडू जाहीर केले असून सर्व क्रिकेटप्रेमी न्यूझीलंड संघाच्या अंतिम ११ खेळाडूंची वाट पाहत आहेत.
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत भारत विरुद्ध न्यूझीलंड असा अंतिम सामना होणार आहे. भारतीय संघाने सामना सुरू होण्याचा २४ तास अगोदरच आपला संघ घोषित केला होता, परंतु सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे, न्यूझीलंड संघाचे अंतिम ११ खेळाडू कोण? न्यूझीलंड संघाच्या व्यवस्थापन मंडळाकडून अजून याची काहीच माहिती आली नाही. जोपर्यंत नाणेफेक होत नाहीत तोपर्यंत न्यूझीलंड संघाचे अंतिम ११ खेळाडू काय असतील हे जाणून घेण्यात अजून थोडा वेळ लागू शकतो. (why new zealand have not announced their playing xi for wtc final against india)
न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षक गॅरी स्टीड यांनी सागितलं की, “हे खूप आश्चर्यकारक आहे. आमचे अंतिम ११ खेळाडू जाणून घेण्यात भारतीय क्रिकेटप्रेमींना अधिक रस आहे. आम्ही ही गोष्ट अजून लांबणीवर ठेवली आहे. कारण जोपर्यंत आम्ही तिकडे पोहोचत नाही आणि खेळपट्टीला पाहत नाही तोपर्यंत आम्ही आमचे अंतिम ११ खेळाडू घोषित करणार नाही. कदाचित आमचे अंतिम ११ खेळाडू नाणेफेक झाल्यानंतरच घोषित होतील. त्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना नाणेफेकीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे.”
भारतीय संघाने आपल्या संघात सहा फलंदाज त्यामध्ये एक यष्टी रक्षक घेतला आहे. दोन अनुभवी अष्टपैलू खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. आणि ३ वेगवान गोलंदाजांना घेतले आहे. खेळपट्टीवर हिरवळ असल्याने वेगवान गोलंदाजांना भरपूर फायदा मिळण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
WTC Final: कोहली अन् शास्त्रींची प्लेइंग इलेव्हनची निवड फसली? साउथम्पटनची खेळपट्टी करतेय इशारा
नादच खुळा! अश्विन- जडेजाची जोडी बनेल भारतीय संघासाठी ब्रह्मास्त्र, ३५ कसोटीत घेतल्यात ३६२ विकेट्स
भारत-न्यूझीलंड फायनलवर संकटाचे ‘काळे ढग’, पहिल्या दिवसाचा खेळ उशिरा सुरू होण्याचे संकेत