आयपीएल 2021चा नववा सामना रोहित शर्माची मुंबई इंडियन्स आणि डेविड वॉर्नरच्या सनरायजर्स हैदराबाद संघात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आला. या सामन्यात रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने 20 षटकांत 5 गडी गमावून 150 धावा केल्या. तर लक्ष्याचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादने 19.4 षटकांत सर्वबाद केवळ 137 धावा केल्याने त्यांना 13 धावांनी पराभव पत्करावा लागला.
हा हैदराबादचा या हंगामातील सलग तिसरा पराभव होता. त्यामुळे या हंगामात सनरायझर्स हैदराबादच्या सलग तिसर्या पराभवानंतर चाहते संघ व्यवस्थापनाबाबत चांगलेच नाराज असून त्यांनी संघाच्या अंतिम अकरामध्ये अष्टपैलू केदार जाधव याचा समावेश करण्याची मागणी केली आहे.
क्रिकेट चाहत्यांव्यतिरिक्त माजी भारतीय खेळाडू प्रज्ञान ओझानेही केदार जाधव याला अंतिम 11 मध्ये समाविष्ट करण्याचे सुचवले आहे. ओझाने म्हटले आहे की, “केदारने चेन्नई सुपर किंग्जकडून एमए चिदंबरम स्टेडियमवर बरेच सामने खेळले आहेत. अशा परिस्थितीत त्याला या मैदानावर खेळायचा खूप अनुभव आहे. त्यामुळे त्याला हैदराबाद संघात संधी मिळाली तर तो मधल्या फळीतील समस्या सोडवू शकतो.”
आयपीएल 2021 च्या लिलावात केदार जाधवला सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याच्या दोन कोटींच्या मूलभूत किंमतीत खरेदी केले आहे. आतापर्यंतच्या त्याच्या आयपीएल कामगिरीबद्दल बोलायचे तर यामध्ये त्याने एकूण 85 सामन्यातील 75 डावात फलंदाजी करताना 22.8 च्या सरासरीने 1141 धावा केल्या आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये चार अर्धशतकांचीही नोंद केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पृथ्वी शॉचा अक्षरशः डोळ्याचे पारणे फेडणारा षटकार, पाहा व्हिडिओ
‘बर्थडे स्पेशल’ अर्धशतक करत केएल राहुलने मिळवले ‘या’ दिग्गजांच्या यादीत स्थान
लाजवाब राहुल! अर्धशतक ठोकताच आयपीएलमध्ये ‘ही’ कामगिरी करणारा बनला पहिला फलंदाज