टी20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघानं आज (4 जुलै) दिल्लीत पंतप्रधान मोदींची भेट घेतली. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. या व्हिडीओमध्ये सर्व खेळाडू पंतप्रधानांशी बोलताना दिसत आहेत. संभाषणात हशा आणि मस्करीही पाहायला मिळत आहे.
यावेळी पंतप्रधानांनी सर्व खेळाडूंसोबत छायाचित्रे काढली. मात्र जेव्हा विश्वचषक ट्रॉफीसोबत फोटो काढण्याची वेळ आली, तेव्हा त्यांनी ट्रॉफीला हात न लावता कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा हात धरला. पंतप्रधानांनी ट्रॉफीला हात लावला नाही, याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आता मोदींना असं का केलं? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. चला तर मग, या बातमीद्वारे आम्ही तुमच्या सर्व शंका दूर करतो.
PM Narendra Modi didn’t hold the World Cup trophy, instead held Rohit and David’s hands. 🌟 pic.twitter.com/0gzbfHxGmx
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 4, 2024
असं म्हटलं जातं की, केवळ निवडक लोकांनाच अधिकृतपणे विश्वचषक ट्रॉफीला स्पर्श करण्याची परवानगी आहे. यात स्पर्धा जिंकणारे खेळाडू, व्यवस्थापक आणि काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. फिफा विश्वचषक ट्रॉफीबाबतही हेच नियम पाळते जातात. हा अधिकृत नियम नाही, मात्र हे सर्वमान्य शिष्टाचार आहेत. यामुळेच कदाचित पंतप्रधानांनी विश्वचषक ट्रॉफीला हातानं स्पर्श केला नसावा.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. मोदीनं लिहिलं, “आमच्या चॅम्पियन्ससोबत एक अप्रतिम भेट. विश्वचषक विजेत्या संघाशी स्पर्धेदरम्यान त्यांच्या अनुभवांवर संस्मरणीय संभाषण झालं.” मोदींच्या भेटीनंतर टीम इंडिया लगेच मुंबईकडे रवाना झाली. तेथे भारतीय संघाच्या विजयी परेडचं आयोजन करण्यात आलं आहे. टी20 विश्वचषक जिंकल्यानंतर पंतप्रधान मोदींनी भारतीय संघाला फोनवर शुभेच्छा दिल्या होत्या. मोदींनी 29 जून रोजी सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करुन भारतीय संघातील खेळाडूंचं अभिनंदन केलं होतं.
An excellent meeting with our Champions!
Hosted the World Cup winning team at 7, LKM and had a memorable conversation on their experiences through the tournament. pic.twitter.com/roqhyQRTnn
— Narendra Modi (@narendramodi) July 4, 2024
महत्त्वाच्या बातम्या –
अभिमानाचा क्षण! मुख्यमंत्र्यांचं खास आमंत्रण, रोहित शर्मासह या खेळाडूंना विधानसभेत भेटीसाठी बोलावलं
भारतीय संघाने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास व्हिडिओ आला समोर
टीम इंडियानं बार्बाडोसहून ज्या विमानानं प्रवास केला, त्यानं बनवला मोठा विक्रम! जाणून घ्या