क्रीडाजगतात कोणत्याही खेळामध्ये खेळाडूंच्या जर्सीवर एक नंबर असतो. तो नंबर त्या खेळाडूंची एकप्रकारे ओळख असते. या नंबरमागे अनेक कारणे असतात. एखादा खेळाडू आपल्या आवडीचा नंबर निवडतो आणि तो नंबर असलेली जर्सी सामन्यात घालतो. अशाचप्रकारे क्रिकेटमध्येही जर्सीवरील नंबरमागे खेळाडूंचे आपले खास कारण असते.
आर अश्विन खेळत होता ९९९ नंबरची जर्सी घालून
क्रिकेटच्या मैदानावर प्रत्येक खेळाडूला आपल्या आवडीच्या नंबरची जर्सी घालायला आवडते. तो नंबर त्यांच्यासाठी लकी मानला जातो. अशाप्रकारे नंबरच्या बाबतीत आयपीएलच्या १३ व्या हंगामात एक अनोखा देखावा पाहायला मिळाला.
यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाचा फिरकीपटू आर अश्विन आपल्या जर्सीच्या मागे ९९ च्या ऐवजी ९९९ या नंबरसोबत खेळताना दिसत होता.
आर अश्विनच्या जर्सीवरील ९ नंबरला कव्हर करण्यामागचे कारण आले समोर
तसं पाहिलं, तर अश्विन भारतीय क्रिकेट संघ किंवा इतर कोणत्याही संघाकडून खेळताना नेहमी ९९ नंबरची जर्सी घालतो. परंतु यावेळी तो ९९९ नंबरची जर्सीसोबत तो मैदानावर दिसला.
परंतु अचानकच अश्विनने ५ ऑक्टोबरला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात आपल्या जर्सीवरील ९९९ या नंबरमधील एक आकडा कव्हर केला होता. आणि त्यानंतर तो पुन्हा ९९ नंबरच्या जर्सीमध्ये आला.
अमित मिश्रा गेल्यानंतर अश्विनने पुन्हा घातली ९९ नंबरची जर्सी
याबद्दल सर्वांनाच उत्सुकता लागली आहे की, अश्विनने आधी आपल्या जर्सीवरील नंबर ९९ वरून ९९९ केला आणि त्यानंतर काही सामन्यांनंतर पुन्हा ९९ नंबरची जर्सी घातली. याचा खुलासा झाला. ज्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्यांच्याच संघातील एक खेळाडू आहे.
खरं तर दिल्ली कॅपिटल्समध्ये खेळणारा अमित मिश्रा आधीपासूनच ९९ नंबरची जर्सी घालत होता. त्यानंतर अश्विन संघात आला. त्यामुळे त्याने आपल्या जर्सीवर ९९ नंबरसोबत ९ हा आकडा जोडला. आणि ९९९ असा नंबर आपल्या जर्सीवर लावून खेळत होता. परंतु दुखापतीनंतर अमित मिश्रा संपूर्ण हंगामातून बाहेर पडला आहे.
मिश्रा बाहेर पडल्यामुळे अश्विन पुन्हा एकदा ९९९ नंबरच्या जर्सीमधील एक आकडा कव्हर करत ९९ नंबरच्या जर्सीमध्ये आला आहे.
दिल्ली संघ आयपीएल २०२०च्या गुणतालिकेत १० गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा पुढील सामना बुधवारी (१४ ऑक्टोबर) दुबई येथे राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-फिंचला मंकडींगने बाद न करण्याचे कारण आले समोर; स्वत: अश्विनने केला खुलासा
-दुःखद ! आर अश्विनच्या संघसहकाऱ्याने घेतला जगाचा निरोप
-एकच नंबर! पृथ्वी शाॅने मारलेला खणखणीत षटकार पाहून विराट कोहली अचंबित, पाहा व्हिडिओ
ट्रेंडिंग लेख-
-‘मिड सीजन ट्रान्सफर’चा फायदा घेत चेन्नई ‘या’ ३ खेळाडूंना घेणार का आपल्या संघात?
-चेन्नई सुपर किंग्सला चौथ्यांदा आयपीएल चषक मिळवून देऊ शकतात हे ३ महारथी
-विरोधी संघ खुश..! आयपीएल २०२०मध्ये बिघडला या ३ स्टार खेळाडूंचा फॉर्म