IND vs AFG T20I: भारत आणि अफगाणिस्तान संघ 11 जानेवारीपासून 3 सामन्यांच्या टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भिडणार आहेत. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने शनिवारी (6 जानेवारी) या मालिकेसाठी 19 सदस्यीय संघ जाहीर केला. नियमित कर्णधार राशिद खान संघात परतला आहे. मात्र, तो भारताविरुद्धच्या मालिकेत कर्णधार असणार नाही. त्याच्या जागी अफगाणिस्तानने इब्राहिम झाद्रान याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे, ज्याने अलीकडेच त्याच्या नेतृत्वाखाली यूएई विरुद्ध टी20 मालिका जिंकली होती. भारतीय संघासाठी आनंदाची बातमी म्हणजे अफगाणिस्तानचा धडाकेबाज फिरकी गोलंदाज राशिद खानला टी20 संघात स्थान मिळाले असले तरी तो एकही सामना खेळेल हे निश्चित नाही.
भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील पहिला टी20 सामना 11 जानेवारी रोजी मोहाली येथे खेळवला जाईल. राशीद खान (Rashid Khan) याच्यावर नुकतीच इंग्लंडमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाली आहे. सध्या तो यातून सावरत आहे. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने संघाची घोषणा करताना म्हटले आहे की, “राशिद खानला संघात स्थान मिळाले आहे पण भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील एकही सामना तो खेळू शकणार नाही. कारण नुकतीच त्याच्या पाठीवर शस्त्रक्रिया झाली होती ज्यातून तो बरा होत आहे. त्याचा फिटनेस पाहूनच त्याचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाईल.”
राशिद खान अफगाणिस्तानचा सामना विजेता खेळाडू आहे. त्याच्या फिरकी गोलंदाजीत सामन्याची दिशा बदलण्याची क्षमता आहे. खालच्या क्रमांकावर येत असताना राशीदला बॅटनेही चमत्कार कसा करायचे हे माहित आहे. तो भारताविरुद्ध कोणताही सामना खेळला नाही तर अफगाणिस्तान संघासाठी तो मोठा धक्का असेल. अफगाणिस्तानने नुकतीच यूएई विरुद्ध टी20 मालिका खेळली होती, राशिद त्या मालिकेतून संघाबाहेर होता. त्याच्या जागी झाद्रानकडे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी20 सामना 11 जानेवारीला मोहालीत, तर दुसरा आणि तिसरा सामना अनुक्रमे 14 आणि 17 जानेवारीला इंदोर आणि बेंगलोरमध्ये खेळला जाईल. (Why Rashid Khan won’t play against India despite being in the T20 team?)
भारत दौऱ्यासाठी निवडलेला अफगाणिस्तान संघ –
इब्राहिम झदरन (कर्णधार), रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), इक्रम अलीखिल (यष्टीरक्षक), हजरतुल्ला झाझाई, रहमत शाह, नजीबुल्ला झदरन, मोहम्मद नबी, करीम जनात, अजमतुल्ला ओमरझाई, शराफुद्दीन अश्रफ, मुजीब उर रहमान, फजलहक फारूकी, फरीद अहमद, नवीन -उल-हक, नूर अहमद, मोहम्मद सलीम, कैस अहमद, गुलबदिन नायब, राशिद खान.
हेही वाचा
T20 Future of Rohit-Virat: जय शहाच रोहित-विराटचं टी20 भविष्य ठरवू शकतात, घेऊ शकतील ‘हा’ मोठा निर्णय
David Warner: शेवटच्या सामन्यानंतर वॉर्नरने आई-वडिलांचे मानले आभार, पत्नीबद्दल बोलताना झाला भावूक, म्हणाला, ‘तू माझ्यासाठी खूप…’