वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेनंतर भारताला पाच सामन्यांची टी20 मालिकाही या दौऱ्यात खेळायची आहे. 3 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी (5 जुलै) भारतीय संघ घोषित केला. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असून संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले. असे असले तरी भारतीय संघात निवड होण्याची अपेक्षा असताना रिंकू सिंग याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. मात्र, त्याला संधी का नाकारण्यात आली याबाबत अंदाज व्यक्त केला जात आहे.
आयपीएल 2023 मधील सर्वात मोठी कहाणी ठरलेल्या रिंकू याला भारतीय संघात संधी मिळावी अशी मागणी चाहते तसेच अनेक माजी क्रिकेटपटू करताना दिसत होते. सहाव्या सातव्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याने कोलकाता नाईट रायडर्ससाठी एकहाती सामने जिंकून दिले होते. एका षटकात 20 पेक्षा जास्त धावा करण्याची कामगिरी त्याने एकाच हंगामात तीनदा करून दाखवली.
असे असताना त्याला संधी मिळण्याची दाट शक्यता होती. मात्र, त्याच्याकडे दुर्लक्ष करत तिलक वर्मा याला संधी दिली. रिंकू सध्या बंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल झालेला आहे. त्याच्या तंदुरुस्तीचा मुद्दा आहे असे काही सूत्र सांगत आहेत. त्यामुळे आता त्याला संधी मिळाली नसली तरी पुढील मालिकेत तो नक्कीच भारतीय संघाचा भाग असेल असे सांगितले आहे.
कोलकाता नाईट रायडर्ससाठी यावर्षी हंगामात त्याने सर्वोत्तम कामगिरी केली होती. 14 सामन्यात त्याने 59 पेक्षा जास्त सरासरीने 474 धावा केल्या होत्या. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट देखील 149 असा जबरदस्त राहिला. यादरम्यान त्याच्या बॅटमधून तब्बल 29 षटकार आले होते. गुजरातविरुद्ध अखेरच्या सामन्यात सलग 5 षटकार मारत त्याने संघाला एक ऐतिहासिक विजय मिळवून दिला होता.
(Why Rinku Singh Ignored By Selection Committee He Has Fitness Issue)
महत्वाच्या बातम्या –
INDvsWI । जयस्वालपासून ते बिश्नोईपर्यंत; रोहितच्या अनुपस्थितीत ‘यांना’ संधी, प्रमुख दावेदार मात्र बाहेरच
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद