श्रीलंकेविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी भारतीय संघाची रोजी घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव टी20 मालिकेत टीम इंडियाचं नेतृत्व करेल, तर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा कर्णधार असणार आहे. शुबमन गिलला टी20 आणि एकदिवसीय मालिकेसाठी उपकर्णधार बनवण्यात आलं आहे.
आश्चर्याची बाब म्हणजे, यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनला श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान मिळालं नाही. मात्र, संजूचा टी20 संघात समावेश करण्यात आला आहे. संजू सॅमसननं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलं होतं. हा टीम इंडियानं खेळलेला शेवटचा एकदिवसीय सामना होता. मात्र असं असूनही संजू सॅमसनची एकदिवसीय मालिकेसाठी संघात निवड न होणे हा थोडा आश्चर्याचा निर्णय आहे. संजूची संघात निवड न होण्याची ही तीन मोठी कारणं असू शकतात.
(1) संजूचा फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष – 29 वर्षांचा संजू सॅमसन फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर संघर्ष करताना दिसतो. श्रीलंकेविरुद्धचे तिन्ही एकदिवसीय सामने कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवर खेळण्यात येणार आहे. या स्टेडियमची खेळपट्टी फिरकीपटूंना, विशेषतः लेगस्पिनर्सना अनुकूल असते. श्रीलंकेचा लेग-स्पिनर वानिंदू हसरंगानं या मैदानावर चांगली कामगिरी केली असून त्यानं 10 एकदिवसीय सामन्यांमध्ये 17 बळी घेतले आहेत. तो सॅमसनसमोर खडतर आव्हान उभं करू शकतो. हसरंगानं संजूला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत तीनदा बाद केलं आहे.
(2) केएल राहुलचा अनुभव – अनुभवी फलंदाज केएल राहुलमुळे संजू सॅमसनला वनडे संघात स्थान मिळणं कठीण होतं. राहुलची एकदिवसीय क्रिकेटमधील अलीकडची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. या फॉरमॅटमध्ये तो सातत्यानं धावा ठोकतोय. 2023 एकदिवसीय विश्वचषकातही राहुलनं बॅटनं चमकदार कामगिरी केली होती. त्या विश्वचषकात राहुलनं 10 डावात 452 धावा केल्या होत्या, ज्यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
(3) रिषभ पंतचा पर्याय – भारतीय निवडकर्ते आता भविष्याकडे पाहत आहेत. अशा परिस्थितीत 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या दृष्टीनं मॅनेजमेंटला रिषभ पंतसारख्या खेळाडूला संधी द्यायची आहे. रिषभ हा डावखुरा फलंदाज असल्यानं तो संघात विविधता आणतो. याशिवाय त्याची आक्रमक फलंदाजी आणि यष्टिरक्षण कौशल्यही संघासाठी खूप उपयुक्त ठरतं.
महत्त्वाच्या बातम्या –
आयपीएल 2025 पूर्वी केएल राहुल परतणार RCBच्या ताफ्यात?
प्रशिक्षक बनताच गंभीरने काढला धोनीवरचा राग? टीम इंडियातून सीएसकेचे चौघे ‘क्लिन बोल्ड’, सोशल मीडियावर चर्चा
सर्वांच्या नजरा सूर्यकुमार यादववर! कर्णधार बनवण्यासाठी प्रयत्न करतील या 3 आयपीएल फ्रँचायजी