श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या शिखर धवनला आगामी टी २० विश्वचषक २०२१ साठी संघाबाहेरचा मार्ग दाखवण्यात आला आहे. विश्वचषकाच्या टी -२० संघात कदाचित धवन आपले स्थान बनवू शकणार नाही अशी भीती आधीच होती आणि असेच काहीसे घडले आहे. मात्र, भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते चेतन शर्मा याच्याशी असहमती दर्शवत आपले मत व्यक्त केले आहे.
शिखर धवनचे स्थान कसोटी संघात नाही. अशा परिस्थितीत, टी-२० मधून देखील बाहेर पडल्यानंतर आता तो केवळ एकदिवसीय क्रिकेटमध्येच राहिला आहे. चेतन शर्मानी म्हटले आहे की, धवन हा खेळाच्या सर्वात लहान प्रकारात संघासाठी एक महत्त्वाचा भाग आहे. त्याला आता फक्त विश्रांती दिली जात आहे.
चेतन शर्मा पुढे म्हणाले, “शिखर धवन आमच्यासाठी खूप महत्वाचा खेळाडू आहे. श्रीलंका दौऱ्यावर तो कर्णधार म्हणून संघात होता. सध्या गरज आणि वेळ आहे, ती इतर खेळाडूंचा वापर करून घेण्याची आणि शिखरला थोडा आराम देण्याची. तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे आणि लवकरच संघात परत येईल.”
रोहित शर्मा, केएल राहुल आणि इशान किशनच्या रूपात संघात तीन सलामीवीर आहेत, पण वेळ आली तर कर्णधार विराट कोहलीही रोहितसह डावाची सलामी देऊ शकतो.
चेतन शर्मा पुढे म्हणाले, “आमच्याकडे तीन सलामीवीर रोहित शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन आहेत. किशन मधल्या फळीत तसेच डावाच्या सुरुवातीलाही खेळू शकतो, ज्यामुळे आमचा एक पर्याय वाढला आहे. तो फिरकीपटूंनाही चांगला खेळतो. कोहलीला डाव सुरु करायचा आहे की नाही हे संघ व्यवस्थापनाला ठरवायचे आहे. टी-२० मध्ये फळीमध्ये फलंदाजी करताना विराटचा चांगला रेकॉर्ड आहे, पण त्यावेळच्या परिस्थितीवर सर्व काही अवलंबून असेल.”
महत्त्वाच्या बातम्या –
टी-२० विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घोषणा; डू प्लेसिस, मलानला डच्चू
चार वर्षांनंतर भारताच्या टी२० संघातील अश्विनच्या निवडी मागचे खरे कारण आले समोर