---Advertisement---

बापरे! चालू सामन्यात इनहेलर वापरताना इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड कॅमेऱ्यात कैद

On: शनिवार, ऑगस्ट 15, 2020 5:20 PM
---Advertisement---

मुंबई । साऊथॅम्प्टनच्या एजेज बाऊलमध्ये  इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड काहीसा अस्वस्थ दिसून आला. चौथ्या षटकात तो इनहेलर घेताना दिसला. त्याला इनहेलर वापरता पाहून चाहत्यांना आश्चर्य वाटले. ब्रॉडला दम्याचा त्रास असल्याचे खूप कमी लोकांना माहित आहे. तथापि, 2015 मध्ये एका मुलाखतीदरम्यान त्याने दम्याचा त्रास असल्याचे सांगितले होते.

सामन्याच्या पहिल्याच दिवशी त्याने शानदार स्पेल टाकला. त्याने  13 षटकांत 31 धावा देऊन एक बळी घेतला. स्टुअर्ट ब्रॉड गेली 14 वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत आहे. त्याने बऱ्याच वर्षांपासून दम्याचा त्रास लपविला. पाच वर्षांपूर्वी त्याने हे रहस्य सर्वांसमोर उघड केले होते.

स्टुअर्ट ब्रॉडने डेली मेलमध्ये लिहिले आहे की, “एका रात्री आम्हाला स्वतःबद्दल माहिती देण्यास सांगण्यात आले जे दुसर्‍या कोणास ठाऊक नव्हते. मला दमा आहे असं सांगितल्यावर टीममधील सर्व खेळाडूंना धक्का बसला, कारण माझा जन्म तीन महिने आधीच झाला होता. मी जवळजवळ मृत्यूच्या जवळच होतो. माझ्या फेफड्यांचा विकास झाला नाही. म्हणून मला इनहेलर वापरावा लागतो. त्याचा माझ्या खेळावर कधी परिणाम झाला नाही. मी क्रिकेट फक्त एका फेफड्यासह खेळत आहे.”

सामन्यात पहिल्याच दिवसाप्रमाणेच दुसर्‍या दिवशीही पावसामुळे बराच वेळ वाया गेला. नाणेफेक जिंकून पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 9 विकेट्समध्ये 223 धावा केल्या. दुसर्‍या दिवसाचा खेळ संपेपर्यंत मोहम्मद रिझवान नाबाद 60 आणि नसीम शाह 1 धावांवर नाबाद आहेत.

पावसामुळे सामन्याच्या पहिल्या दिवशी केवळ 45.4 षटके आणि दुसर्‍या दिवशी 40.2 षटके खेळली गेली. नाणेफेक जिंकल्यानंतर पाकिस्तानकडून आबिद अलीने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बाबर आझमने 47 धावांची खेळी केली. त्याचवेळी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसनने 3-3 विकेट्स घेतल्या.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---