आगामी टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ तयारीसाठी बोर्ड अनेक प्रयोग करू पाहत आहेत. मागील काही मालिकांमध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) कर्णधार म्हणून अनेक खेळाडूंना आजमावून पाहिले आहे. तसेच सलामीवीरांच्या अनेक जोड्यांमध्येही बदल केले गेले आहेत. सर्वाधिक वेळा कर्णधार रोहित शर्मासोबत इशान किशन सलामीला आहे. सध्या भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यावर खेळल्या जाणाऱ्या टी२० मालिकेत रोहित शर्मासोबत सूर्यकुमार यादव सलामीला आला.
सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) नेहमी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मंगळवारी (२ ऑगस्ट) झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात त्याने सलामीला येत जबरदस्त खेळी केली. त्याने १७२.७३च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. त्याने ४४ चेंडूत ७६ धावा केल्या. यामध्ये ८ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. तर या मालिकेतील पहिल्या दोन सामन्याच त्याच्या बॅटमधून धावा निघाल्या नव्हत्या. त्याने पहिल्या सामन्यात १६ चेंडूत २४ आणि दुसऱ्या सामन्यात ५ चेंडूत ११ धावा केल्या होत्या.
सुर्यकुमारला सलामीला फलंदाजी करताना काही माजी क्रिकेटपटूंनी नाराजी व्यक्त केली होती. यावर भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, “फलंदाज कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. पण त्याला त्या स्थानावर कायम राहण्याऐवजी चांगली कामगिरी करता आली पाहिजे.”
मंगळवारी नाणेफेक झाल्यावर रोहित म्हणाला, “आम्हाला वाटते की फलंदाजांनी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करायला हवी. त्यांनी एकाच क्रमांकावर फलंदाजी केली पाहिजे असे आम्हाला वाटत नाही. तसेच काही विशेष खेळाडूंकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा असू शकतो.”
सूर्यकुमारने सलामीला फलंदाजी केली यावर भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफ याने प्रश्न निर्माण केले होते. त्याने म्हटले, “इंग्लंडमध्ये रिषभ पंतला सलामीला खेळवले होते, वेस्ट इंडिजमध्ये मात्र त्यात बदल करण्यात आला आहे.” तसेच त्याने पंतला फक्त दोनच सामन्यात का खेळवून पाहिले यावरही आश्चर्य व्यक्त केले आहे.
कैफबरोबरच माजी क्रिकेटपटू आणि मुख्य निवडकर्ते के. श्रीकांत यांनी पण संघाच्या सलामीच्या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले. त्यांनी म्हटले, “जर सूर्यकुमारने सलामीलाच फलंदाजी केली, तर त्याची कारकिर्दच वाया जाईल. तो नेहमी चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो, तर त्याने तेथेच खेळले पाहिजे.”
सूर्यकुमारने या टी२० मालिकेतील पहिल्या तिन्ही सामन्यात आतापर्यंत सलामीलाच फलंदाजी केली आहे. यामध्ये त्याने ३७च्या सरासराने १११ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर
सहा चेंडूत ३४ धावा कुटणाऱ्या ‘या’ फलंदाजाकडे एकेकाळी शूज घ्यायलाही नव्हते पैसे, जुने ट्वीट व्हायरल
दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर गेलेल्या कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण! म्हणाला, ‘सध्या मी…’






