---Advertisement---

सहा चेंडूत ३४ धावा कुटणाऱ्या ‘या’ फलंदाजाकडे एकेकाळी शूज घ्यायलाही नव्हते पैसे, जुने ट्वीट व्हायरल

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 1:59 PM
Ryan Burl
---Advertisement---

बांगलादेश संघ सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर आहे. बांगलादेश आणि यजमान झिम्बाब्वे यांच्यातील टी-२० मालिकेचा शेवट मंगळवारी (२ ऑगस्ट) झाला. शेवटच्या सामन्यात झिम्बाब्वेचा मध्यक्रमातील फलंदाज रायन बर्ल याने दमदार प्रदर्शन केले. मालिकेतील या शेवटच्या सामन्यात संघाला विजय मिळवून देण्यासाठी बर्लची खेळी सर्वात महत्वाची ठरली. या सामन्यातील त्याच्या प्रदर्शानानंतर बर्लने केलेले एक जुने ट्वीट पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. 

रायन बर्ल (Ryan Burl) याने बांगलादेश संघाविरुद्ध या सामन्यात एका षटकात ३४ धावा कुटल्या. टी-२० क्रिकेटमध्ये एका षटकातात सर्वाधिक धावा करणारा तो चौथा खेळाडू ठरला आहे. ही कामगिरी त्याने डावातील १५ व्या षटकात केली. बांगालदेशचा फिरकी गोलंदाज नसूम अहमद (Nasum Ahmed) याने हे षटक टोकले होते. षटकातील पहिल्या चार चेंडूंवर बर्लने लागोपाठ चार षटकार मारले. त्यानंतर षटकातील पाचव्या चेंडूवर त्याने चौकार ठोकला आणि शेवटच्या चेंडूवर पुन्हा एक षटकार मारला. या धुवाधार प्रदर्शनासाठी बर्लचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

झिम्बाब्वेने हा सामना १० धावांनी जिंकला आणि मालिका देखील नावावर केली. ही पहिली वेळ आहे, जेव्हा बांगलादेशविरुद्धच्या टी-२० मालिकेत झिम्बाब्वे संघ जिंकला आहे. संघाच्या या उत्कृष्ट प्रदर्शनासाठी आज जगभरात त्यांचे कौतुक होत आहे. मात्र, संघासाठी काही वर्षांपूर्वी परिस्थिती अशा प्रकारे अनुकून नव्हती. खेळाडूंना खेळण्यासाठी आवश्यक असणारे साहित्य घेण्यापुरतेही पैसे मिळत नव्हते.

याच पार्श्वभूमीवर रायन बर्लने २२ मे, २०२१ रोजी एक ट्वीट केले होते. ट्वीटमध्ये लिहिले होते की, “आम्हाला स्पॉन्सर मिळण्याची काही शक्यता आहे का? जेणेकरून प्रत्येक मालिका संपल्यानंतर आम्हाला शुजला पुन्हा ग्लू करण्याची वेळ येणार नाही.” तसे पाहिले तर, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील इतर सर्व संघाच्या खेळाडूंना साहित्याची कसल्याही प्रकारची कमतरता नसते. हे बोर्ड खेळाडून प्रत्येक सामन्यात नवीन शूज देखील घेऊ शकतात.

परंतु, झिम्बाब्वे संघाकडे २०२१ मध्ये प्रायोजक नव्हते. याच कारणास्तव बोर्ड खेळाडूंचे शूज खराब झाल्यानंतर वेळेवर नवीन शूजही देऊ शकते नव्हते. बर्लने केलेले हे ट्वीट त्यावेळी संघ आणि बोर्ड दोघांच्या फायद्याचे ठरले होते. ट्वीट व्हायरल झाल्यामुळे ‘पुमा’ ब्रँडकडून संघाला तत्काळ स्पॉन्सरशिप मिळाली होती.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

दुखापतीमुळे सामन्यातून बाहेर गेलेल्या कर्णधार रोहितने दिले स्पष्टीकरण! म्हणाला, ‘सध्या मी…’

विंडीज संघाला झटका देणारे भारताचे ‘चार’ शिलेदार, यांच्यामुळे शक्य झाला विजय

बलविंदर सिंग संधू। १९८३ वर्ल्डकप फायनलमध्ये सर्वात मोठा मासा गळाला लावणारा पठ्ठ्या

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---