कोलकाता। रविवार (२१ नोव्हेंबर) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात टी२० मालिकेचा अखेरचा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात न्यूझीलंडचे नेतृत्तव मिशेल सँटेनरने केले. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडला की या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात नेतृत्त्व केलेला टीम साऊथी या सामन्यातून बाहेर का झाला? पण न्यूझीलंड क्रिकेटने यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
खरंतर न्यूझीलंड संघाचे नियमित कर्णधारपद केन विलियम्सन सांभाळतो. पण, त्याला या टी२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यात अनुभवी वेगवान गोलंदाज टीम साऊथीने न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद सांभाळले. पण, आगामी भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेचा विचार करता आता साऊथीला देखील तिसऱ्या टी२० सामन्यादरम्यान विश्रांती देण्यात आल्याचे न्यूझीलंडने सांगितले. त्याचमुळे तिसऱ्या टी२० सामन्यात मिशेल सँटेनरने संघाचे नेतृत्त्व केले.
सँटेनरने पहिल्यांदाच टी२० क्रिकेटमध्ये न्यूझीलंडचे नेतृत्त्व केले. तो न्यूझीलंडचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नेतृत्त्व करणारा नववा कर्णधार ठरला आहे. सँटेनरने संघाचे नेतृत्त्व करताना गोलंदाजीही चांगली केली. त्याने ४ षटकांत २७ धावा देत ३ विकेट्स घेतल्या.
New captain tonight in Mitch Santner as Rohit Sharma again wins the toss but this time elects to bat. One change with Lockie Ferguson in for Tim Southee who's rested ahead of the Test series. Follow play LIVE in NZ on @skysportnz. Scoring | https://t.co/N6jpmeAeh4 #INDvNZ pic.twitter.com/JSjrKb7Znp
— BLACKCAPS (@BLACKCAPS) November 21, 2021
कसोटी मालिकेसाठी विलियम्सन, साऊथी परतणार
ही टी२० मालिका संपल्यानंतर २५ नोव्हेंबरपासून भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात २ सामन्यांची कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेसाठी केन विलियम्सन आणि टीम साऊथी न्यूझीलंड संघाकडून खेळताना दिसणार आहेत. या मालिकेतील पहिला सामना २५ ते २९ नोव्हेंबरदरम्यान कानपूर येथे होणार आहे. त्यानंतर, ३ ते ७ डिसेंबरदरम्यान मुंबईमध्ये दुसरा टी२० सामना खेळला जाईल. ही मालिका कसोटी अजिंक्यपद २०२१-२३ स्पर्धेचा भाग आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
रोहित-ईडन गार्डन्सचे ‘अजोड’ नाते तुफानी अर्धशतकाने झाले आणखीन वृद्धिंगत
‘हिटमॅन’चं विश्वविक्रमी अर्धशतक! विराटला मागे टाकत ‘या’ यादीत रोहित पहिल्या क्रमांकावर विराजमान
माईलस्टोन अलर्ट! भारताच्या युझवेंद्र चहलसाठी कोलकाता टी२० राहिली विक्रमी, केला ‘हा’ खास किर्तीमान