आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात भारतीय संघाने आतापर्यंत सर्वात निराशाजनक कामगिरी केली आहे. यूएई आणि ओमानमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारतीय संघाला पहिल्या दोन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या सामन्यात पाकिस्तान संघाने भारतीय संघावर १० गडी राखून विजय मिळवला होता. तर दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंड संघाने ८ गडी राखून विजय मिळवला होता. या स्पर्धेत हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार आणि इतर खेळाडूंना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले आहे. ज्यामुळे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली निवडण्यात आलेल्या संघावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत.
वरूण चक्रवर्ती फिट नसतानाही संघात दिले स्थान
टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी वरूण चक्रवर्ती फिट होता का? याचे उत्तर भारतीय निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापकांना द्यावे लागणार आहे. कारण सुरुवातीच्या दोन्ही सामन्यात तो थकलेला दिसून आला आहे. आयपीएल २०२१ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाविरुद्ध झालेल्या क्वालिफायरच्या दुसऱ्या सामन्यात वरूण चक्रवर्ती दुखापतग्रस्त झाला होता. तरीदेखील त्याची टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
भुवनेश्वर कुमारची फिटनेस
भुवनेश्वर कुमार पूर्णपणे फिट नसताना देखील त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये का संधी दिली गेली? भुवनेश्वर कुमार गेल्या कित्येक महिन्यांपासून तंदुरुस्त होण्याच्या प्रयत्नात आहे. त्याला पाकिस्तान संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात संधी दिली गेली होती. परंतु तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. त्यानंतर न्यूझीलंड संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला प्लेइंग ईलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. तसेच याापूर्वी आयपीएल २०२१ स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात देखील त्याला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. त्याला अवघे ३ गडी बाद करण्यात यश आले होते. तरीही त्याला टी२० विश्वचषकासाठी निवडण्यात आले.
हार्दिक पंड्याला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात स्थान
हार्दिक पंड्या गेल्या काही महिन्यांपासून दुखापतग्रस्त आहे. पाठीच्या दुखापतीमुळे त्याला गोलंदाजी करण्यात अडचणीचा सामना करावा लागत होता. तसेच फलंदाजी करताना देखील तो लयीत दिसून येत नव्हता.आयपीएल २०२१ स्पर्धेत देखील तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. तरीदेखील त्याची आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली होती. या स्पर्धेतील पहिल्या दोन्ही सामन्यात तो मोठी खेळी करण्यात आणि गडी बाद करण्यात अपयशी ठरला.
युझवेंद्र चहलच्या जागी राहुल चाहरला स्थान
टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सर्वात यशस्वी गोलंदाज युझवेंद्र चहलची आयसीसी टी -२० विश्वचषक स्पर्धेसाठी निवड करण्यात आली नाही. त्याने नुकताच संपन्न झालेल्या आयपीएल २०२१ स्पर्धेचा दुसऱ्या टप्प्यात १८ गडी बाद केले होते. तरीदेखील त्याच्याऐवजी युवा राहुल चाहरला संधी देण्यात आली. मुख्य बाब म्हणजे सुरुवातीच्या दोन सामन्यात राहुल चाहरला अंतिम एकादशमध्ये संधी देण्यात आली नाहीये.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (यष्टिरक्षक), ईशान किशन (यष्टिरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, राहुल चाहर, रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद शमी
राखीव खेळाडू : श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहर
महत्त्वाच्या बातम्या-
ब्रेकिंग! पुन्हा मैदानावर दिसणार षटकारांची आतषबाजी; माजी अष्टपैलू युवराजने केली पुनरागमनाची घोषणा
टी२० विश्वचषक सामन्यानंतर टी२० क्रमवारीतही पाकिस्तानचा भारताला ‘दे धक्का’, ठरला वरचढ