---Advertisement---

आरसीबीची नवी रणनीती! प्लेसिस संघात असतानाही विराट का करतोय नेतृत्व?

On: रविवार, एप्रिल 23, 2023 4:29 PM
---Advertisement---

रविवारी (दि. 23 एप्रिल) आयपीएल 2023 मध्ये डबल हेडर (एका दिवशी दोन सामने) सामने खेळवले जाणार आहेत. दिवसातील पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर वि. राजस्थान रॉयल्स संघात 3.30 वाजता सुरू झाला. या सामन्यात पुन्हा एकदा आरसीबीचे नेतृत्व विराट कोहली करताना दिसला. दोन वर्षांपूर्वीच कर्णधार म्हणून आपली भूमिका संपवलेल्या विराटला या हंगामात सलग दुसऱ्यांदा चाहते नेतृत्व करताना पाहत आहेत. मात्र, नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस संघात असतानाही विराट का नेतृत्व करत आहे? याबाबत आपण जाणून घेऊया.

 

विराट कोहलीने यापूर्वी झालेल्या पंजाबविरुद्धच्या सामन्यात देखील संघाचे नेतृत्व केले होते. विराटने 11 ऑक्टोबर, 2021 रोजी आरसीबी संघाचे कर्णधारपद सोडले होते. यानंतर त्याने आता 556 दिवसांनंतर कर्णधारपदाची धुरा पुन्हा सांभाळलेली. त्याने इतक्या दिवसांच्या कालावधीनंतरही नेतृत्व करताना संघाला मोठा विजय मिळवून दिला होता.

विराट नेतृत्व करत असला तरी संघाचा नियमित कर्णधार फाफ डू प्लेसिस हा संघात खेळताना दिसतो. चेन्नईविरुद्धच्या सामन्यावेळी प्लेसिसला बरगड्यांची दुखापत झाली होती. त्यामुळे तो पूर्णवेळ क्षेत्ररक्षण करण्यासाठी उपलब्ध नाही. याच कारणाने कर्णधाराची जबाबदारी विराट सांभाळताना दिसतो. फाफ फलंदाजी केल्यानंतर इम्पॅक्ट प्लेयर नियमानुसार बाहेर जातो. तसेच त्याच्या जागी एका गोलंदाजाला संधी देण्यात येते.

आरसीबीचा कर्णधार म्हणून विचार केल्यास विराट कोहलीने 141 सामन्यात संघाचे नेतृत्व केले आहे. यामध्ये त्याने 65 सामन्यात विजय मिळवला असून, 69 सामन्यात त्याला पराभवाचा सामना करावा लागला आहे. तसेच, 3 सामने बरोबरीत सुटले, तर 4 सामन्यांचा निकाल लागला नाही.

(Why Virat Kohli Leading RCB In IPL 2023 When Faf Du Plessis In Team)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तो पंड्या नेतृत्वात स्मार्ट, पण लखनऊ…’, पराभवानंतर दिग्गजाने पुन्हा साधला राहुलवर निशाणा
संजूच्या ‘रॉयल्स’ने जिंकला टॉस, RCB संघ विराटच्याच नेतृत्वाखाली देणार ‘टॉपर’ला झुंज

 

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---