क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरू आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला होता. पहिल्या कसोटी सामन्यात अप्रतिम गोलंदाजी करणारा शार्दुल ठाकूर दुखापतीमुळे या सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्याजागी आर अश्विनला संधी दिली जाईल असा अंदाज व्यक्त केला गेला होता, परंतु असे झाले नाही. त्याच्याऐवजी ईशांत शर्माला संधी दिली गेली आहे. पण काय आहे अश्विनला संघाबाहेर ठेवण्याचे कारण? चला जाणून घेऊया.
शार्दुल ठाकूरची मागील काही काळातील अप्रतिम कामगिरी पाहून त्याला या संघात स्थान दिले गेले होते. पहिल्या कसोटी सामन्यात चांगली कामगिरी केल्यानंतर दुसरा कसोटी सामना सुरू होण्यापूर्वी त्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो संघाबाहेर झाला आहे. त्यामुळे अश्विनचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. परंतु विराटने या सामन्यात देखील ४ वेगवान गोलंदाजांसह मैदानात जाण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे दुखापतीतून पुनरागमन करणाऱ्या ईशांत शर्माला या संघात स्थान देण्यात आले आहे. यामुळे पुन्हा एकदा आर अश्विन संघात स्थान मिळवण्यास अपयशी ठरला आहे.
काय म्हणाला विराट?
नाणेफेक झाल्यानंतर विराट कोहली म्हणाला की, “आम्ही १२ खेळाडूंची घोषणा केली होती. या १२ खेळाडूंमध्ये अश्विनला स्थान देण्यात आले आहे. परंतु खेळपट्टी आणि परिस्थिती ही वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल आहे, ज्यामुळे चौथा गोलंदाज म्हणून आम्ही ईशांत शर्माला संधी दिली आहे.”
कोहलीने सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केली होते की, शार्दुलऐवजी ज्या खेळाडूला संघात संधी दिली जाईल. त्यावेळी त्याची फलंदाजी करण्याची क्षमता पहिली जाणार नाही. तसेच नाणेफेक झाल्यानंतर तो पुढे म्हणाला की, “प्रत्येकाला सामन्यात आपले योगदान द्यायचे आहे. ते फलंदाज असो किंवा इतर कोणी, आम्हाला आमचे काम पूर्ण करायचे आहे. हेच आमचे लक्ष्य आहे. विशेषतः मैदानात प्रेक्षकांचे आगमन झाल्याने खूप आनंद होत आहे. त्यांच्यासमोर खेळून खूप अभिमान वाटत आहे.”(Why Virat Kohli picks Ishant Sharma and not r Ashwin in playing eleven, click here to know the reason)
भारताची प्लेइंग इलेव्हन (११ खेळाडू) : केएल राहुल, रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, रिषभ पंत, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज
इंग्लंडची प्लेइंग इलेव्हन (११ खेळाडू) : रॉरी बर्न्स, डॉम सिब्ले, हसीब हमीद, जो रुट (कर्णधार), जोनी बेअरस्टो, जोस बटलर, मोईन अली, सॅम करन, ओली रॉबिन्सन, मार्क वूड आणि जेम्स अँडरसन
महत्त्वाच्या बातम्या-
ENG vs IND 2nd Test Day 1 Live: रोहित शर्माचे अर्धशतक पूर्ण, ३१ षटकांनंतर भारताच्या बिनबाद ९२ धावा
सिराजच्या ‘शट अप’ सेलिब्रेशनवर यष्टीरक्षक फलंदाजाने मुरडले नाक; म्हणाला, ‘पुढे जाऊन समजेल’






