India vs England 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील पहिला सामना हैदराबादमध्ये खेळवला जात आहे. टीम इंडियाने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी आवेश खान यालाही संघात संधी दिली होती. आवेशचा देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगला रेकॉर्ड आहे. पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने हैदराबाद कसोटीपूर्वी त्याला संघातून बाहेर काढले आहे. वृत्तानुसार, आवेशला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले आहे. तो रणजीमध्ये मध्य प्रदेशकडून खेळतो.
आवेश खान भारताकडून टी-20 आणि एकदिवसीय सामने खेळला आहे. आता त्याला कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळणार होती. मात्र त्यापूर्वीच त्याला संघातून रिलीज करण्यात आले. मात्र, आवेश लवकर संघात परत येऊ शकतो. आवेशने भारतासाठी 8 वनडे सामन्यात 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्याचबरोबर 20 टी-20 सामन्यांमध्ये 19 विकेट्स घेतल्या आहेत.18 धावात 4 विकेट्स ही त्याची टी-20 मधील सर्वोत्तम कामगिरी आहे. आवेशने वनडेमध्ये एका डावात 4 विकेट्स घेतल्या आहेत.
आवेशला भारताच्या 16 सदस्यीय संघात स्थान मिळाले. मात्र आता त्याला कसोटी संघातून मुक्त करण्यात आले आहे. आवेशला रणजी ट्रॉफीसाठी सोडण्यात आले आहे. तो मध्य प्रदेशकडून खेळू शकणार आहे. रणजी ट्रॉफी 2023-24 मधील मध्य प्रदेशचा पहिला आणि दुसरा सामना अनिर्णित राहिला. संघाने तिसऱ्या सामन्यात दिल्लीचा 86 धावांनी पराभव केला होता.
🚨 Toss Update 🚨
England win the toss in Hyderabad and elect to bat in the 1st #INDvENG Test.
Fast bowler Avesh Khan has been released to play for his Ranji trophy team, Madhya Pradesh for their next Ranji Trophy fixture.
Rajat Patidar has joined the team as Virat Kohli's… pic.twitter.com/g9TfcLZZvs
— BCCI (@BCCI) January 25, 2024
उल्लेखनीय म्हणजे याआधी विराट कोहली याने पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला होता. वैयक्तिक कारणांमुळे तो हैदराबाद कसोटीत खेळत नाहीये. कोहलीच्या जागी टीम इंडियाने रजत पाटीदारचा संघात समावेश केला आहे. मात्र, पाटीदारला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालेले नाही. (Why was Avesh Khan kicked out of Team India? Read what is the whole case)
हेही वाचा
AUS vs WI: कोरोनाची लागण झाल्यानंतरही कॅमेरून ग्रीन खेळला सामना, पाहा आयसीसीने काय घेतला निर्णय
IND vs ENG: अनिल कुंबळेने सांगितला भारत-इंग्लंड कसोटी मालिकेचा निकाल, केली धक्कादायक भविष्यवाणी