कुलदीप यादव याने भारतीय संघासाठी आशिया चषक 2023 मध्ये महत्वापूर्ण प्रदर्शन केले. आपल्या अप्रतिम गोलंदाजीसाठी त्याला मालाकावीर पुरस्कार मिळाला. भारताला आपली आठवी आशिया चषख ट्रॉफी मिळवून देण्यासाठी कुलदीपचे योगदान मोलाचे ठरले. असे असले तरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुक्रवारी (19 सप्टेंबर) सुरू होणाऱ्या वनडे मालिकेत पहिल्या दोन सामन्यांमध्ये कुलदीप खेळणार नाही. कर्णधार रोहितने याचे कारण स्पष्ट केले.
कुलदीप यादव () याने नुकत्याच पार पडलेल्या आशिया चषक स्पर्धेत 5 सामन्यांमध्ये 9 विकेट्स घेतल्या. कुलदीप पाचवा सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. पण त्याने घेतलेल्या विकेट्स संघाच्या विजयासाठी महत्वाच्या ठरल्या आणि त्याला मालिकावीर म्हणून निवडले गेले. आगामी वनडे विश्वचषकापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत एकमेकांशी भिडतील. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये कुलदीपला विश्रांती दिली केली आहे. कर्णधार रोहित शर्मा () याने दिलेल्या माहितीनुसार संघ कुलदीपची गोलंदाजी विरोधी संघाला जास्त समजू नये, यासाठी फिरकीपटू गोलंदाजाल विश्रांतीवर पाठवत आहे.
सोमवारी (18 सप्टेंबर) ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली गेली. हा संघ समोर आल्यानंतर रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर () यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी रोहितने कुलदीपला पहिल्या दोन सामन्यात बाहेर बवण्याचे कारण सांगितले की, “आम्ही मागच्या दीड वर्षांपासून कुलदीपला पाहत आहोत. त्यामुळेच आम्ही त्याला जास्त एक्सपोज (उघड) करू इच्छित नाही. तो शेवटच्या सामन्यातून पुनरागमन करेल.” (Why will Kuldeep not be in the first two ODIs against Australia? A big revelation from captain Rohit)
ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
केएल राहुल (कर्णधार), रविंद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ईशान किशन, शार्दुल ठाकूर, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यांसाठी भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, ईशान किशन, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, रविचंद्रन अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.