वनडे विश्वचषक 2023 ला सुरुवात होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत. मात्र, त्याआधीच अनेक संघांचे प्रमुख खेळाडू फिटनेसशी झुंजत असून, दुखापतग्रस्त झाले आहेत. या यादीत दक्षिण आफ्रिकेचे दोन वेगवान गोलंदाज एन्रिक नॉर्किए आणि सिसांडा मगाला यांचा समावेश झाला आहे. विश्वचषकातील या दोन्ही खेळाडूंची उपलब्धता या आठवड्यात होणाऱ्या फिटनेस चाचणीवर अवलंबून असेल. या दोघांचा या स्पर्धेसाठी दक्षिण आफ्रिकेच्या 15 सदस्यीय संघात समावेश करण्यात आला होता.
पाठीच्या खालच्या बाजूला दुखापत होण्यापूर्वी आणि डाव्या गुडघ्याला दुखापत होण्यापूर्वी नॉर्किए ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या वनडे मालिकेत एकच सामना खेळला होता. त्याने दुसऱ्या वनडे सामन्यात भाग घेतला होता. पाठीच्या दुखण्यामुळे मैदान सोडण्यापूर्वी त्याने फक्त पाच षटके टाकली. त्यानंतर त्याने फलंदाजीत 10 धावांचे योगदान दिले. मात्र, दुखापतीमुळे तो उर्वरित सामन्यांमध्ये भाग घेऊ शकला नाही.
मगालाने मालिकेतील तिसऱ्या वनडे सामन्यात भाग घेतला आणि चार षटके गोलंदाजी केली. दक्षिण आफ्रिका संघ भारतात रवाना होण्यापूर्वी 23 सप्टेंबर रोजी दोन्ही वेगवान गोलंदाजांबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल. संघाचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर्स यांनी विश्वचषकासाठी रवाना होण्याआधीच याबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचे सूतोवाच केले आहे. हे दोन्ही खेळाडू उपलब्ध नसल्यास त्यांच्या जागी वेन पार्नेल व ऍंडिल फेकलुकवायो यांची वर्णी लागू शकते.
विश्वचषकासाठी दक्षिण आफ्रिका संघ:
टेंबा बवुमा (कर्णधार), जेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रीझा हेंड्रिक्स, मार्को जेन्सन, हेन्रिक क्लासेन, सिसांडा मागाला, केशव महाराज, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, एन्रिक नॉर्किए, कगिसो रबाडा, तबरेझ शम्सी, रासी वॅन डर डसेन.
(Anrich Nortje And Sisanda Magala Might Out Of 2023 ODI World Cup)
महत्वाच्या बातम्या –
मायदेशात परतल्यानंतरही कर्णधार रोहितने जिंकले मन! चाहत्यांसाठी थांबवली आपली मर्सिडीज एस क्लास
बीसीसीआय आणि एनसीएच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ही! श्रेयस अय्यरच्या दुखापतीमुळे संतापला माजी दिग्गज






