रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने इंडियन प्रीमियर लीग 2025 साठी तीन खेळाडूंना कायम ठेवले आहे. कायम ठेवलेल्या खेळाडूंमध्ये विराट कोहली (21 कोटी), रजत पाटीदार (11 कोटी) आणि यश दयाल (5 कोटी) यांचा समावेश आहे. मात्र फ्रँचायझीने एक खेळाडू सोडला आहे ज्याचे नाव आरसीबीच्या रिटेंशनच्या यादीत जास्त चर्चेत होते. मोहम्मद सिराज असे या खेळाडूचे नाव आहे. सिराज 2018 पासून आरसीबीकडून खेळत आहे आणि संघातील प्रमुख गोलंदाजांपैकी एक आहे, परंतु यावेळी सिराज लिलावात दिसणार आहे.
आरसीबीने रिटेंशनमध्ये सिराजच्या जागी यश दयालला 5 कोटी रुपयांना रिटेन करून सर्वांना चकित केले. यश दयालला अनकॅप्ड खेळाडू म्हणून कायम ठेवण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आरसीबीने सिराजला काय न ठेवण्याचा निर्णय घेण्याचे कारण काय होते? आरसीबी सिराजसाठी आरटीएम कार्ड वापरणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशा परिस्थितीत सिराजला रिटेन न ठेवण्याची आतली कहाणी जाणून घेऊया.
यश दयालला कायम ठेवण्याचे कारण
आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक एँडी फ्लॉवर यांनी सिराजच्या जागी दयालला कायम ठेवण्याचे खास कारण सांगितले आहे. फ्लॉवर म्हणाले, ‘दयालला कायम ठेवल्याने आम्हाला खूप आनंद होत आहे. तो एक विलक्षण प्रतिभा असलेला खेळाडू आहे. डावखुरा गोलंदाज असल्याने दयाल चेंडू दोन्ही बाजूंनी स्विंग करण्यास सक्षम आहे. यामुळे आमचे गोलंदाजी आक्रमण मजबूत होईल. लिलावात दयालसारखा टॅलेंट मिळण्याची आशा कमी आहे. गेल्या मोसमात त्याने आरसीबीसाठी दमदार कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याला कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
आरसीबीचे क्रिकेट संचालक मो बबट यांनीही दयालला कायम ठेवण्याबाबत काही खास सांगितले आहे. यश दयालला कायम ठेवण्याबाबत मो बबट म्हणाले, ‘रजत पाटीदारसह यश दयालला कायम ठेवणे संघासाठी खूप चांगले ठरणार आहे. हे दोघेही महान खेळाडू आहेत. यात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यश दयाल हा अनकॅप्ड आहे. तो अनकॅप्ड असल्यामुळे आमची काही रक्कमही वाचली आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘सर्व खेळाडूंशी आमचे खास नाते आहे. म्हणूनच त्यांना सोडताना नेहमीच दुःख होते. ज्या खेळाडूंना आत्तासाठी सोडण्यात आले आहे त्यांना मी फक्त शुभेच्छा देऊ शकतो. आम्ही आता आमच्या लिलावाची तयारी सुरू करत आहोत, ज्यामध्ये आम्ही सर्वोच्च भारतीय प्रतिभेवर लक्ष ठेवू. याशिवाय आम्ही आरटीएमबाबत आमची रणनीती तयार करत आहोत.’
हेही वाचा –
“कोणीतरी लवकरच पिवळी जर्सी घालेल”, सीएसकेच्या माजी खेळाडूने पंतबाबत दिले मोठे संकेत
मुंबई कसोटीचा पहिला दिवस न्यूझीलंडच्या नावे, अखेरच्या सत्रात टीम इंडियाची घसरगुंडी!
5 डावात 100 धावाही नाही! रोहित शर्माला झालंय तरी काय? आकडेवारी फारच खराब