वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची टी20 मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिले तीन सामने जिंकून मालिका जिंकणाऱ्या इंग्लंड संघाला मालिकेतील चौथ्या सामन्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. आता सलग पराभवानंतर वेस्ट इंडिजने अखेर या मालिकेतील चौथ्या सामन्यात शानदार पुनरागमन केले आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील चौथा सामना डॅरेन सॅमी नॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळण्यात आला होता. जे वेस्ट इंडिजने 5 विकेट्सने सहज जिंकले.
दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात इंग्लंडचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. संघाने शानदार फलंदाजी करत 20 षटकांत केवळ 5 गडी गमावून 218 धावा केल्या. यादरम्यान फिल सॉल्ट आणि जेकब बेथेल यांनीही इंग्लंडकडून शानदार अर्धशतके झळकावली. सामन्यात फिल सॉल्टने 55 आणि जेकब बेथेलने 62 धावा केल्या.
The 2️⃣nd highest target chased by the #MenInMaroon in T20Is to take the win! 🙌🏾#TheRivalry | #WIvENG pic.twitter.com/ycBSNhxKnX
— Windies Cricket (@windiescricket) November 16, 2024
या सामन्याच्या पहिल्या डावात इंग्लंडची दमदार फलंदाजी पाहून असे वाटत होते की, हा सामनाही ते जिंकतील आणि या मालिकेत इंग्लंडचा संघ 4-0 अशी आघाडी घेईल. पण वेस्ट इंडिजच्या फलंदाजांचे इरादे वेगळेच होते. त्यांनी अवघ्या 19 षटकांत 5 गडी गमावून 221 धावा केल्या आणि सामना जिंकला. वेस्ट इंडिजसाठी त्यांचे सलामीवीर एविन लुईस आणि शाई होप यांनी शानदार खेळी खेळली. या सामन्यात एविन लुईसने 31 चेंडूत 68 तर शाई होपने 24 चेंडूत 54 धावा केल्या. शाई होपला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले. आता या मालिकेतील शेवटचा सामना आज म्हणजे (17 नोव्हेंबरला) होणार आहे. जे याच ठिकाणी आयोजित केले जाणार आहे.
हेही वाचा-
IND vs AUS: रोहित-शुबमनशिवाय टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार? संघाचं नेतृत्व कोणाकडे?
IND vs AUS: रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली कसोटी का खेळू नये? पाहा मोठे कारण
India vs China; भारताने हाॅकीमध्ये चीनचा 3-0 ने उडवला धुव्वा…!