वेस्ट इंडीज आणि भारत यांच्यातील टी-२० मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी (२९ जुलै) ब्रायन लारा स्टेडियमवर खेळला गेला. वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण भारतीय संघाने तो पूर्णपणे चुकीचा ठरवला आणि ६८ धावांनी विजय मिळवला. वेस्ट इंडीजच्या फलंदाजीवेळी भारतीय खेळाडूंनी गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचा उत्कृष्ट नमुना सादर केला. क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत खासकरून श्रेयस अय्यरचे कौतुक केले जात आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी केली. मर्यादित २० षटकांमध्ये भारताने ६ विकेट्सच्या नुकसानावर तब्बल १९० धावा उभ्या केल्या. प्रत्युत्तरात वेस्ट इंडीज संघ हे लक्ष्य गाठू शकला नाही. वेस्ट इंडीजने २० षटकांमध्ये ८ विकेट्सच्या नुकसानावर १२२ धावा केल्या. भारतीय संघाचा महत्वाचा खेळाडू श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) फलंदाजीमध्ये अपयशी ठरला, परंतु क्षेत्ररक्षण करताना त्याने उत्कृष्ट प्रदर्शन केले.
वेस्ट इंडीजच्या डावातील चौथ्या षटकात श्रेयस अय्यर सीमारेषेच्या जवळ क्षेत्ररक्षणासाठी उभा होता. या षटकात गोलंदाजी करत होता रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin). अश्विनच्या षटकातील पहिल्याच चेंडूवर वेस्ट इंडीजचा कर्णधार निकोलस पूरन (Nicholas Pooran) याने मोठा शॉट खेळण्याचा निर्णय घेतला. मीड विकेटच्या दिशेने त्याने मोठा शॉट मारला देखील, परंतु त्याठिकाणी उभा असलेल्या श्रेयसने चेंडू रोखला. पूरनने मारलेला हा चेंडून सहज षटकार गेला असता, पण श्रेयरने हवेत उडी मारून चेंडू मैदानात पुन्हा टाकला आणि स्वतः सीमारेषेच्या बाहेर जाऊन पडला.
Well, that's a SUPERMAN move by @ShreyasIyer15!
Watch the India tour of West Indies, only on #FanCode????https://t.co/RCdQk1l7GU@BCCI @windiescricket#WIvIND #INDvsWIonFanCode #INDvsWI pic.twitter.com/GuC3MbdwzV
— FanCode (@FanCode) July 29, 2022
या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी सर्वजण श्रेयसचे कौतुक करत आहेत. वेस्ट इंडीज संघाला ज्या ठिकाणी ६ धावा मिळणे अपेक्षित होते, त्याठिकाणी श्रेयसमुळे त्यांना फक्त दोन धावांवर समाधान मानावे लागले. असे असले तरी, फलंदाजी करताना मात्र श्रेयसने चाहत्यांची चांगलीच निराशा केली. त्याने एकूण ४ चेंडू खेळले आणि एकही धाव न करता बाद झाला. आयर्लंडविरुद्ध शतक केलेल्या दीपक हुड्डा याला वेस्ट इंडीजविरुद्धच्या या पहिल्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनच्या बाहेर ठेवून श्रेयसला संघात संधी दिली गेली होती. परंतु तो टी-२० मध्ये पुन्हा एकदा अपयशी ठरला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘ती असती तर आम्ही…’, पहिल्या टी२० पराभवानंतर रेणूका सिंगने व्यक्त केलं दु:ख
कार्तिकच्या अंगात संचारली ‘कॅरेबियन पॉवर!’ विंडीज संघाविरुद्ध ‘एवढ्या’ स्ट्राईक रेटने केल्या धावा
महत्वाच्या सामन्यापूर्वी विंडीजचा माजी कर्णधार मैदानातच थिरकला, मजेशीर व्हिडिओ होतोय व्हायरल






