वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसर्या वनडे सामन्यात हार्दिक पंड्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. रोहित शर्मा खेळत नसल्यामुळे संघाचे कर्णधारपद हार्दिककडे सोपवले गेले. मालिकेतील हा दुसरा सामना शनिवारी (29 जुलै) बारबाडोसमध्ये खेळला जात आहे. हार्दिकच्या नेतृत्वातील भारतीय संघाला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले आहे. हार्दिक पंड्या आणि ईशान किशन या सामन्यात भारतासाठी डावाची सुरुवात करतील.
रोहित शर्मासह विराट कोहली (Virat Kohli) यालाही दुसऱ्या वनडेत विश्रांती दिली गेली आहे. भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन (Sanju Samson) यालाही दुसऱ्या वनडे सामन्यासाठी निवडले गेले आहे. सॅमसनने आपला शेवटचा वनडे सामना नोव्हेंबर 2022 मध्ये न्ययूझीलंडविरुद्ध खेळला होता. त्याचसोबत अष्टपैलू अक्षर पटेल (Axar Patel) यालाही भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यात आले. (wi vs ind 2nd ODI toss update west indies opts to bowl)
दुसऱ्या वनडेसाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत: शुभमन गिल, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, उमरान मलिक, मुकेश कुमार.
वेस्ट इंडीज: ब्रँडन किंग, काइल मेयर्स, अलिक अथनाझे, शाई होप (यष्टीरक्षक/कर्णधार), शिमरॉन हेटमायर, केसी कार्टी, रोमारियो शेफर्ड, यानिक कॅरिया, गुडाकेश मोती, अल्झारी जोसेफ, जेडेन सील्स.
महत्वाच्या बातम्या –
WIvsIND । विराटकडून धोनीच्या विक्रमाला तडा जाणार? यादीत रोहित सर्वोच्च स्थानी
टी20 संघातून बाहेर असलेल्या विराट-रोहितबद्दल कॅरेबियन दिग्गजाचे मोठे विधान, म्हणाला…