भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीजसोबत तीन सामन्यांची वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतून भारतीय संघ विश्वचषकासाठी आपल्या तयारीला सुरुवात करतोय. भारतीय संघात कर्णधार रोहित शर्मा व विराट कोहली हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अनुभवी फलंदाज आहेत. मागील पंधरा वर्षांपासून या दोघांनी देखील भारतीय क्रिकेटची मोठ्या प्रमाणात सेवा करत अनेक विक्रम रचले आहेत. असे असतानाच वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज कर्टली ऍम्ब्रोज यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
ऍम्ब्रोज यांनी नुकतीच एका भारतीय युट्युब चॅनलला मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी रोहित यांचे तोंडभरून कौतुक केले. भारतीय कर्णधार रोहित शर्माबद्दल बोलताना ते म्हणाले,
“रोहितकडे इतकी क्षमता नक्कीच आहे की, तो जगातील सर्वोत्तम बनू शकतो. त्याच्या मला या गुणाचे फार कौतुक वाटते की, तो त्याला हवे तेव्हा मोठे फटके खेळून आक्रमक रूप घेऊ शकतो. एक चांगला खेळाडू आणि शानदार कर्णधार म्हणून मला तो आवडतो.”
याबरोबरच विराटबद्दल बोलताना ते म्हणाले,
“विराटची फलंदाजी पाहणे एक पर्वणी असते. तो अजिबात आक्रमक रूप न दाखवता वेगाने धावा काढू शकतो. त्याचा खेळ पाहणे डोळ्यांना आल्हाददायक असते. तो एकाच स्ट्राईक रेटने खेळून मोठ्या धावा करू शकतो तसेच षटकार मारण्यातही तो सहजता दाखवतो.”
रोहित हा 2007 पासून तर विराट 2008 पासून भारतीय संघाचा भाग आहे. दोघांनी देखील भारतीय संघाचे नेतृत्व केले असून, अनेक वैयक्तिक विक्रम त्यांच्या नावे नोंद आहेत. सध्या हे दोघे बऱ्याच काळापासून आंतरराष्ट्रीय टी20 खेळलेले नाहीत. वेस्ट इंडीजविरुद्ध होणाऱ्या मालिकेत देखील या दोघांचा सहभाग नसेल.
(Curtly Ambrose Praised Virat Kohli And Rohit Sharma)
महत्वाच्या बातम्या –
स्टुअर्ट ब्रॉडचा भीमपराक्रम! बनला ऑस्ट्रेलियाविरुद्ध ‘अशी’ कामगिरी करणारा इंग्लंडचा पहिला-वहिला गोलंदाज
स्मिथच्या रनआऊट वादावर ब्रॉडचा मोठा खुलासा, ‘कुमार धर्मसेना म्हणाले होते…’